वर्ष 2025 मध्ये अनेक खतरनाक युद्ध होण्याची आणि नैसर्गिक संकटं कोसळण्याचे भाकीत बाबा वेंगाने वर्तवले होते. तिचे काही भाकीत खरी ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. बाबा वेंगाचा मृत्यू 1996 मध्ये झाला. पण तिची अनेक भाकीत आजही प्रसिद्ध आहेत. तिने पुढील कित्येक वर्षांच्या भविष्यवाण्या करुन ठेवल्याचा दावा करण्यात येतो. 2026 मध्ये जगावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भविष्यवाणी तिने केली आहे. कॅश क्रश (Cash Crush) अशा नावाने तिचे हे भाकीत जगभरात व्हायरल झालं आहे. अमेरिकेवरील आर्थिक संकटाच्या रुपाने त्याकडे पाहण्यात येत आहे.
ब्रिटिश मीडियानुसार, बाबा वेंगाने दावा केला आहे की, 2026 मध्ये जगभरातील अनेक व्यवस्था धराशायी होतील. रोखी आणि डिजिटल चलन उद्धवस्त होतील. जागतिक बाजारात अस्थिरता, महागाई आणि व्याजदरात वाढ होण्याचे भाकीत तिने वर्तवले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या टॅरिफ धोरणाने जगभर गोंधळ उडालेला आहे. अमेरिकेला रशिया, चीन, भारत आणि ब्रिक्स देश जुमानत नसल्याने हा वाद भडकण्याची भीती आहे. त्यात अमेरिकेचे पण मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Cash Crush चे भाकीत
हिंदुस्थान टाईम्सने ब्रिटिश मीडियाआधारे Cash Crush विषयीच्या भाकिताबाबत दावा केला आहे. या भाकितानुसार पुढील वर्षात 2026 मध्ये फिजिकल आणि डिजिटल हे दोन्ही चलन कोसळतील. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था धराशायी होतील. बँका दिवाळखोरीत निघतील. बाजारात पैशांचे मूल्य अचानक घसरेल. सगळीकडे अनगोंदी माजेल. पैशांची किंमत घसरल्याने अथवा पैशांचे मूल्य वधारल्याने बाजारात गोंधळ उडेल. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. यामुळे आर्थिक मंदी, ऊर्जा संकट येईल आणि आर्थिक धोरणांना मोठा फटका बसेल.
चीन-तैवान संघर्षात अमेरिका?
चीन आणि तैवान या दोन देशात मोठा संघर्ष उभा ठाकेल. चीन तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, असे भाकीत बाबा वेंगाने वर्तवले आहे. या युद्धात अमेरिका तैवानची मोठी मदत करणार असल्याचे तिचे भाकीत आहे. सध्या चीन तैवान ताब्यात घेण्याची भाषा करू लागला आहे. त्याला रशियाचे बळ मिळत असल्याचे म्हटले जाते. तर 2026 च्या अखेरीस एलियनसोबत संपर्क होईल आणि UFO चा शोध लागेल असा दावा बाबा वेंगाच्या भाकीतात करण्यात आला आहे.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.