अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा झाला
आगामी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. अशामध्ये जळगावमध्ये शिवसेना शिंदे यांची ताकद वाढली आहे. जळगावचे अमळनेर येथील अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Political News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नवा पत्ता उघडला; प्रसिद्ध गायिकेची पक्षात एन्ट्री, निवडणूक लढवणारमुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिरीष चौधरी यांनी माजी नगरसेवक, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. गेल्या निवडणुकांमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांचा भाजपला पाठिंबा होता, स्थानिक कार्यकर्त्यांच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Maharashtra Politics: पुण्यात CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसच्या बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवरमाजी आमदार शिरीष चौधरी यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील झालेल्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात शिरीष चौधरी यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोपस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असताना हिंगोलीत काँग्रेसला मोठा झटका बसला. सलग ३ वेळा काँग्रेसकडून आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा काँग्रेसकडून विजय झाला होता. मात्र मागच्या तीन विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
Konkan Politics : ठाकरेंना कोकणात भाजपकडून धक्क्यावर धक्के, पडद्याकडून कुणी केली खेळी? चेहरा आला समोर