कोळवण, ता. १५ : मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६च्या वार्षिक आषाढी पायी वारीवेळी तरडगाव येथील मुक्कामाच्या ठिकाणी जागा नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय होऊ नये म्हणून मुळशी तालुका वारकरी संप्रदायाने तरडगावातील मुक्कामाच्या ठिकाणी एक एकर जागा खरेदी करण्याचे ठरविले आहे व यासाठी आता तालुक्यामधील दानशूर व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन सढळ हाताने आर्थिक मदत करत आहेत. यामुळे येथील मुक्कामाची जागा विकत घेण्यासाठी वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६ ला मोलाची मदत होणार आहे. तरी तरडगाव येथील मुक्कामाच्या जागेसाठी आणखी रकमेची आवश्यकता असून देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींनी मुळशी तालुका वारकरी संप्रदाय समाज दिंडी क्रमांक ९६ मधील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी वारकरी संप्रदाय समाजाच्या वतीने केले आहे.
जागेसाठी आर्थिक मदत करणारे दानशूर व कंसात रक्कम
संतोष पेरणेकर (तीन लाख), महादेव दुडे (एक लाख वीस हजार), दीपक बाळासाहेब साठे (एक लाख वीस हजार), दीपक साठे (एक लाख वीस हजार), सुभाष कदम (एक लाख वीस हजार), चेतन फाले (७१ हजार) महिना पायी वारी करिता चेतन फाले यांच्याकडून संपूर्ण वर्षभराच्या वारीचा खर्च म्हणून एक लाख एकावन्न हजाराची मदत, स्वाती ढमाले (पन्नास हजार), गोरख सातपुते (पन्नास हजार),
कोंडिबा साठे (अकरा हजार).