डीजीपी नगर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला परिसरातील महिलाना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने नाशिकचा सर्वात मोठा “महिला उद्योजिका महोत्सव-दिवाळी एक्सपो २०२५” मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे!
एकाच छताखाली विविध वस्तू आणि स्वादिष्ट फूडचे तब्बल ११० स्टॉल्स नाशिककरांना आकर्षित करत आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या महोत्सवात, तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी विशेष भेट देत उद्योजिकांना प्रोत्साहन दिलं.
संध्याकाळी झी मराठी प्रस्तुत “उत्सव गीतांचा उत्सव कलाकारांचा” कार्यक्रमात हजारो नागरिकांनी कलाकारांसोबत थिरकून आनंद लुटला. चेतन लोखंडे, चारुलता पाटणकर, अभिजीत पाटणकर, अमोल पालेकर व वाद्यवृंद यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांनी वातावरण रंगतदार केलं. त्याआधी झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धांमध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दररोज सायंकाळी ४ वाजल्यापासूनच नागरिकांची गर्दी उसळत असून, सर्व वयोगटांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो आहे. चार दिवसांत तब्बल २० हजारांहून अधिक नाशिककरांनी महोत्सवाला भेट देत अपार प्रतिसाद दिला आहे.
Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...आदिशक्ती प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या दिवाळी एक्सपोमुळे नाशिकमध्ये दिवाळी साजरी होऊ लागली आहे. आज चौथ्या व अखेरच्या दिवशीही नागरिकांची तुडुंब गर्दी उसळणार असून, सर्व कार्यक्रम आणि एक्सपोचा मनमुराद आनंद नागरिक घेतील. असा विश्वास आयोजक सतीश नाना कुलकर्णी, संध्या कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.