Womens World Cup 2025 : उपांत्य फेरीत एक संघ कन्फर्म, आता तीन संघांसाठी चुरस; भारताची स्थिती काय?
GH News October 17, 2025 01:11 AM

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता प्रत्येक सामन्यानंतर वाढणारा आहे. कारण आता उपांत्य फेरीची शर्यत रंगतदार वळणारव आली आहे. आठ पैकी गुणतालिकेत टॉप 4 संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. नुसते गुणच नाही तर नेट रनरेटही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. या स्पर्धेतील 17वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीत जागा मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. आता उर्वरित तीन जागांसाठी सात संघात चुरस आहे. त्यातही तीन संघ काठावर आहेत. त्यामुळे इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढाई असणार आहे. तर बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा एक पराभव झाला की स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकूण पाच सामने खेळले आहेत. पाच पैकी 4 सामन्यात विजय आणि एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. त्यामुळे 9 गुण आणि +1.818 नेट रनरेटसह आपलं स्थान उपांत्य फेरीत पक्कं केलं आहे. कारण टॉप चार संघांची आकडेवारी पाहिली तर 9 गुण चौथ्या क्रमांकासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिकीट मिळालं आहे. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडला उपांत्य फेरीची संधी आहे. कारण इंग्लंडने 4 पैकी 3 सामने जिंकले आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे उर्वरित तीन पैकी 1 सामना जिंकला तर तिकीट कन्फर्म होईल.

दक्षिण अफ्रिका 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेला उर्वरित तीन पैकी 2 सामने काहीही करून जिंकावेच लागतील. तर उपांत्य फेरीत जागा मिळेल. भारत आणि न्यूझीलंडची स्थिती एकसारखीत आहे. पण भारताला एका गुणाचा फायदा मिळू शकतो. भारताने 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण मिळवले आहे. तर नेट रनरेट हा +0.682 आहे. त्यामुळे उर्वरित तीन पैकी 3 सामने जिंकणं भाग आहे. एकही सामना गमावला तर गणित जर तरवर येईल. न्यूझीलंडची स्थिती काहीशी तशीच आहे. पण एक सामना पावसामुळे ड्रॉ झाल्याने सध्या पदारात 3 गुण आहेत. त्यानाही तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यात भारत न्यूझीलंड हा सामना महत्त्वाचा ठरेल.

बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ काठावर आहे. या संघांना एखादा चमत्कारच उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवू शकतो. या तिन्ही संघानी पुढचा एकही सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आता यापुढे त्यांची करो या मरोची लढाई आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका-भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी चुरस असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.