वणी/दिंडोरी: दिंडोरी परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारी १०८ रुग्णवाहिका चक्क दरवाजाच्या कडीकोयंड्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून गॅरेजमध्ये उभी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पुढील तपासात धक्कादायक बाब
तपासाअंती उघड झाले, की एमएच १४, सीएल ०६०१ ही रुग्णवाहिका प्रत्यक्षात दिंडोरी येथील वनारवाडी फाट्यावरील पेंटिंग-डेंटिंग गॅरेजमध्ये कडीकोयंडा दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून उभी आहे. तरीही अधिकृत नोंदींमध्ये ती ‘ऑन रोड’ दाखवली जात असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे निधी गैरवापराचा संशय व्यक्त केला जात आहे.
ठळक बाबी
१०८ रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून गॅरेजमध्ये
ऑन रेकॉर्ड ‘ऑन रोड’ दाखवून संशयास्पद व्यवहाराचा आरोप
अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत मदत न मिळण्याचा धोका
लोकप्रतिनिधींकडून
पूर्णतः दुर्लक्ष
जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
काय आहे घटना?
मंगळवारी (ता. १४) सायंकाळी ७.२० ला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात गंभीर अपघातग्रस्त रुग्ण
दाखल झाला.
रुग्ण बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविणे आवश्यक होते.
रात्री ८.४२ ला आपत्कालीन प्रतिसाद केंद्राला कॉल करून १०८ रुग्णवाहिका
मागविण्यात आली.
१०८ रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल ०६०१) ‘ऑन रोड’ असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.
संबंधित वाहनचालकाने गाडी नाशिक येथे दुरुस्तीसाठी असल्याचे सांगत ‘गाडी ऑफ रोड’ असल्याची माहिती दिली.
Nashik Crime: हातपाय बांधून विहिरीत टाकलं; नाशिकमधल्या खुनाचं गुढ उलगडलं१०८ रुग्णवाहिकेबाबत तक्रार नित्याची बाब झाली आहे. अनास्थेमुळे रुग्ण दगावणे व मोठी आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते. रुग्णालयात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत दिंडोरीला सुस्थितीत असलेली १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.
- कैलास मवाळ, संचालक, दिंडोरी बाजार समिती