DIY Akash Kandil: घराच्या घरी झटपट आकाशकंदील बनवा, दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा!
esakal October 18, 2025 07:45 AM

Handmade Diwali Decoration Ideas: दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. फराळ, दिवे, रांगोळी, लाईटच्या माळा, फटाके आणि चमचमणारे आकाशकंदील यामुळे दिवाळीची शोभा वाढते. आकाशकंदील हा दिवाळीचा महत्त्वाचा घटक आहे. १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. आकाशकंदील ही त्याच परंपरेची आधुनिक आवृत्ती आहे.

सध्या बाजारात विविध आकारांचे, रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या मटेरिअलचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. पण जर आपण घरीच आकाशकंदील तयार केला तर त्याचा आनंद आणि मजा काही वेगळीच असते. घरातील जुन्या बॉक्सचा पुठ्ठा, आईच्या शिवणकामातील धागे-दोरे, काही मणी आणि थोड्याश्या काड्या वापरूनही सुंदर आकाशकंदील तयार करता येतो. तुम्हीही नक्की प्रयत्न करून पाहा.

Diwali Window Cleaning Tips: या दिवाळीत खिडक्या करा चमकदार! घरगुती सोप्या उपायांनी मिळवा नव्यासारखी झळाळी आकाशकंदील बनवण्यासाठी साहित्य

पुठ्ठा - २

चॉपस्टिकसारख्या काड्या - साधारणतः २० ते २५

हॉट ग्लू गन किवा फेविक्विक

कात्री

लोकर

मोती - १ पाकीट

क्राफ्ट पेपर - छोटे ४

चमचमणारी किंवा रंगीबेरंगी लेस -२

आकाशकंदील बांधायला दोरी

कृती

- सर्वप्रथम पुठ्ठ्यावरून दोन समान आकाराचे गोल तुकडे कापा, हे तुकडे आकाशकंदीलाचे वरचे आणि खालचे भाग असतील. गोल आकार कापण्यासाठी तुम्ही ताट किंवा झाकणाचा साचा म्हणून वापर करू शकता.

- दोन्ही पुठ्ठ्यांच्या गोल कडांवर समान अंतरावर काड्या उभ्या लावून त्यांना हॉट ग्लू गन किंवा फेविक्विकच्या मदतीने चिकटवा.

- सर्व काड्या सरळ बसल्या आहेत याची खात्री करून थोडा वेळ सुकू द्या, म्हणजे चौकट घट्ट बनेल.

- आता तुमच्या आवडीच्या रंगाच्या क्राफ्ट पेपरची साधी फुले बनवा आणि त्याच्या मध्यभागी एक मोती चिकटवा. ही फुलं लावलेल्या काड्यांवर काही अंतर ठेवून चिकटवा.

- नंतर आकाशकंदीलच्या वरच्या आणि खालच्या भागावर चमचमणारी लेस चिकटवा.

Diwali Kids' Safety Tips: दिवाळीत फटाक्यांच्या मजेत मुलांची सुरक्षितता जपा! जाणून घ्या काही आवश्यक टिप्स

- हवे असल्यास तुम्ही मोती, सिक्विन, रंगीत कागदाचे तुकडे किंवा आरसे लावून सजावट करू शकता.

- आता अक्षकंदीलाला अजून आकर्षक बनवण्यासाठी त्याच्या खालच्या भागाला मोती ओवलेले लोकर लटकन म्हणून लावा.

- सर्वात शेवटी आकाशकंदीलाच्या वरच्या पुठ्ठ्याच्या भागात दोन छोटे छिद्र पाड आणि त्यातून मजबूत दोरी ओवून गाठ मारा, ज्यामुळे कंदिल सहज टांगता येईल.

- सर्व काही सुकल्यावर तुमचा सुंदर गोल आकाशकंदील आहे तयार!

- हा आकाशकंदील तुम्ही तयार करू शकता फक्त २००-२५० रुपयांत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.