-rat१७p१५.jpg-
P२५N९९१८९
डॉ. पंकज घाटे
----------
प्रा. पंकज घाटे यांना पीच.एडी.
रत्नागिरी, ता. १७ : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासू प्राध्यापक पंकज घाटे यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण कोकणातील सामाजिक-राजकीय संक्रमण (१८५७ ते १९४७) हा प्रबंधाचा विषय आहे. ब्रिटिश राजवटीखालील दक्षिण कोकणातील समाज, प्रशासन आणि राजकारणातील बदलांचा सखोल मागोवा घेतला आहे. दक्षिण कोकण अर्थात् रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा ब्रिटिशकाळातील घडामोडींचा एकत्रित इतिहास आजवर लिहिला गेला नव्हता. त्यामुळे प्रबंधात विस्मृतीत गेलेले आणि आजवर अप्रकाशित राहिलेले इतिहासाचे पैलू उलगडले आहेत. हे संशोधन कल्याणच्या बी. के. बिर्ला (स्वायत्त) महाविद्यालयातील प्रा. डॉ. स्वप्ना समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाला सादर करण्यात आले.