क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून त्यात कालांतराने बदल होत गेले. खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील पळवाटा थांबवत त्या नियमांची आखणी करण्यात आली. क्रिकेटमधील उत्साह वाढवण्यासाठी मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने नवे नियम तयार करते. आता क्रिकेटन आणखी एका नव्या नियमाची भर पडली आहे. फलंदाजांची डोकॅलिटी पाहूनच आयसीसीने हा नियम तयार केला आहे. त्यामुळे फलंदाजांना आता शॉट मारताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी या नियमाबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.
आयसीसीच्या नव्या नियमानुसार, आता फलंदाजाला स्टम्पच्या मागे जाऊन फटकेबाजी करता येणार नाही. म्हणजेच जर एखादा फलंदाज स्टंपच्या मागे जाऊन फटका मारत असेल तर तो शॉट डेड बॉल घोषित केला जाईल. या स्थितीत कोणत्याही धावा मिळणार नाहीत. तसेच गोलंदाजाला एक निर्धाव चेंडू मिळणार आहे. अशा खेळीत जर फलंदाज त्रिफळाचीत झाला तर तो आऊटच असेल. हा नियम टी20, वनडे आणि कसोटीसाठी लागू असणार आहे. त्यामुळे आता फलंदाजांना असं करून चालणार नाही. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये असे शॉट्स बऱ्याचदा खेळले जातात. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी हा नियम काय ते समजावून सांगितलं आहे.
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड अनेकदा असा शॉट खेळताना दिसला आहे. चेंडू टाकल्यानंतर स्टंपच्या मागे जाऊन फटका मारण्यास तरबेज होता. गोलंदाजांना संभ्रमात टाकण्यासाठी विकेटच्या मागे जायचा. गोलंदाजाला अडचणीत आणून क्षेत्ररक्षण बिघडवण्यासाठी असं करायचा. मात्र एखाद्या फलंदाजाचा पाय किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग खेळपट्टीच्या पृष्ठभागावर स्पर्श करत नसेल, तर पंच हा चेंडू डेड घोषित करतील. चौकार किंवा षटकार मारला तरी त्या धावा गणल्या जाणार नाहीत. त्यामुळे फलंदाजाला आता असा फटका मारण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे.