भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात ADAS म्हणजेच Advanced Driver Assistance System आता फक्त लक्झरी कारपुरतेच मर्यादीत राहिले नाही, जे फिचर्स केवळ महागड्या अलिशान गाड्यांमध्येच (Car) पाहायला मिळत होते, आता भारतात 15 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या कारमध्ये देखील हे सेफ्टी फीचर पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 15 लाख पेक्षा कमी किंमत असलेल्या ADAS फीचर्सवाल्या परवडणाऱ्या आणि खास कारविषयी आज आपण जाणून घेऊया.
ऑटोमोबाईल क्षेत्रात, ADAS सिस्टमचा उद्देश हा ड्रायव्हरला रस्त्यावर सुरक्षित ठेवणे आणि दुर्घटना, अपघाताच्या घटनांना आळा घालणे. त्यामध्ये, कॅमेरा, सेंसर आणि रडारच्या मदतीने कार आपल्या जवळील वाहनांचा आणि रस्त्यांचा अंदाज घेते. तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे जात असते. ADAS ला दोन वेगवेगळ्या पातळीवर विभागण्यात आलं आहे. त्यामध्ये, एक लेव्हल आणि 2 लेव्हल अशी वर्गवारी आहे. लेव्हल 1 मध्ये बेसिक सेफ्टी असिस्ट सारखे डिपार्चर वॉर्निंग आणि फॉरवर्ड कोलिजन अलर्ट यांचा समावेश आहे. तर, लेव्हल 2 मध्ये आणखी अधिक अॅडव्हान्सड फिचर्स आहेत, जसे की ऑटोनॉमस ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, आणि एडेप्टिव क्रूज कंट्रोल यांसारखे फिचर्स आहेत.
जर तुम्ही एक सेदान खरेदी करू इच्छिता ज्यामध्ये ADAS फिचर असावे आणि ती कार बजेटमध्येही असावी. तर, Honda Amaze तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. होंडा अमेझच्या टॉप-एंड ZX वेरिएंट मध्ये ADAS फीचर देण्यात आलं आहे. या कारची किंमत 9.14 लाख (एक्स-शोरूम) आहे. आपल्या सेगमेंटमधील ही एकमात्र सेडान आहे, ज्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या कारच्या फिचर्सला “Honda Sensing” म्हटले जाते, जे कारला अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवते.
Tata Motors ची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली SUV Tata Nexon आता लेवल 2 ADAS फीचरसह मार्केटमध्ये आली आहे. कारचे हे फिचर Fearless +PS Petrol Automatic आणि Red Dark Edition मध्ये उपलब्ध आहेत. ADAS सह Nexon मध्ये लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वार्निंग, ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग सारखे फिचर्स आहेत. कारची किंमत 13.53 लाख (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही कार सर्वात सुरक्षित आणि अॅडव्हान्स एसयुव्ही बनवते.
Mahindra ची XUV 3XO ही एक शानदार SUV आहे, जी लेवल 2 ADAS सह उपलब्ध आहे. कारचे फीचर AX5 L आणि टॉप-स्पेक AX7 L वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑटो ब्रेकिंग, लेन असिस्ट, आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारखे एडवांस फीचर्स देण्यात आले आहेत. ही SUV टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने Tata Nexon ला टक्कर देते.
किया सोनेटमध्ये लेवल 1 ADAS फीचर देण्यात आला आहे. जे GTX+ आणि X-Line वेरिएंटमध्ये आहे. यासह Hyundai Venue देखील SX(O) ट्रिम मध्ये लेवल 1 ADAS सह येते. Honda च्या इतर कार्स जसे की City आणि Elevate देखील ADAS सह येते. सिटीमध्ये V, VX आणि ZX वेरिएंट्समध्ये आणि एलिवेट में ZX वेरिएंट सह हे फीचर्स मिळतात.
ADAS तंत्रज्ञान आता भारतीय ऑटोमोटिव इंडस्ट्रीमध्ये वेगाने पसरत आहे. अगोदर हे फिचर्स केव Hyundai Tucson या MG Gloster सारख्या लग्झरी कार्समध्येच होते. आता Tata, Honda आणि Mahindra सारख्या 15 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कारमध्येही हे फिचर्स आहेत.
आणखी वाचा