वडगाव मावळ, ता. १८ : दिवाळीनिमित्त मावळ सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (ता. २३) दिवाळी पहाट सबरंग स्वरमुग्ध या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अविनाश बवरे यांनी दिली. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षी चावडी चौकाजवळील राजमाचीकर मैदानात गुरुवारी पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात या वेळेत हा कार्यक्रम होईल. सारेगम लिटल चॅम्प स्वरा किंबहुने, देवांश भाटे आदी कलाकारांचा समावेश असलेला संगीत समूह हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अविनाश बवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष बारकू ढोरे, अतुल राऊत, सचिव नितीन भांबळ, खजिनदार विश्वास भिडे, राजेंद्र केंडे, किरण देवघरे, गिरीश गुजराणी, हर्षल ढोरे आदींनी संयोजन केले आहे.
---