Video : पूर्णा आजीने एंट्री केल्या केल्या प्रियाला थोबडवलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश "ज्जे बात..!"
esakal October 19, 2025 06:45 AM

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आता रोहिणी हट्टंगडी यांची एंट्री पूर्णा आजी म्हणून झाली आहे. त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

मालिकेत महीपत आणि नागराजने मुद्दाम केलेल्या गैरसमजामुळे अर्जुनने प्रियाच्या खऱ्या आई-वडिलांना सायलीचे आई- वडील म्हणून घरात आणलं आहे. त्यामुळे लोखंडे कुटूंब आता मुद्दाम आता प्रियाला त्रास देत आहेत. त्यातच आता मालिकेत पूर्णा आजीची एंट्री होणार आहे.

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, वैतागलेली प्रिया मिस्टर आणि मिसेसलोखंडे यांना हात धरून घराबाहेर काढते. सगळे घरचे तिने असं करू नये म्हणून तिला समजावत असतात पण ती ऐकत नाही. प्रियाने ढकलल्यामुळे मिसेस लोखंडे खाली पडतात आणि त्याच्या आधीच फ्रॅक्चर असलेल्या हाताला मार लागतो. तितक्यात पूर्णा आजीची एंट्री होते. ती प्रियाच्या कानाखाली मारते. "हे सुभेदारांचा घर आहे. इथे मोठ्यांचे पाय धरले जातात तोडले जात नाहीत. पुन्हा असं वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू" असं ती म्हणते.

View this post on Instagram

A post shared by star_marathi_serial_official (@star_marathi_serial_official)

प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. "आता मजा येणार","पूर्णा आजी आता त्या प्रियाला घराबाहेर काढा","परफेक्ट पूर्णा आजी. ज्योती चांदेकरानंतर आम्ही यांचीच वाट पाहत होतो","ज्जे बात ! आता प्रियाची जाहीर नाही" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.

प्रिया आता नवीन काय कारस्थान रचणार ? मालिकेत काय ट्विस्ट येणार ? या प्रश्नांची ऊत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

कांतारा पार्ट 1 च्या यशानंतर रिषभ शेट्टीने मानले प्रेक्षकांचे आभार ! गंगा आरतीत सहभागी झाल्याचा व्हिडीओ चर्चेत
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.