उड्डाणपुलावर कचरावाहक वाहनांचा अडथळा
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कचरावाहक वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासी करीत आहेत.
अरुंद उड्डाणपुलावर दुतर्फा कचरावाहक वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करतच मार्गक्रमण करावे लागत आहे. अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक विभाग वाहनांवरील कारवाई करण्यात दुजाभाव करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय रमेश बडगे यांनी केला आहे.