PM मोदींच्या 'व्होकल फॉर लोकल' मोहिमेला चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींचा पाठिंबा
Tv9 Marathi October 19, 2025 08:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘व्होकल फॉर लोकल’ या नावाने स्वदेशी उत्पादनांची खरेदी आणि वापर करण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू आहे. यामुळे पंतप्रधानांनी नागरिकांना परदेशी ब्रँडऐवजी स्थानिक दुकानांमधून उत्पादने खरेदी करण्याचे आणि आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या ब्रँड्सला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाची दखल चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनीही घेतली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सध्या संपूर्ण देशात दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पहायला मिळत आहे. याच काळात पंतप्रधानांनी लोकल फॉर व्होकलचा नारा दिला आहे. पंतप्रधानांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करण्याचे, त्या व्यापाऱ्यासोबत किंवा स्वदेशी वस्तूसोबत सेल्फी काढण्याचे आणि ते फोटो नमो अॅपवर शेअर करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी कृतीतून उत्तर दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, रूपाली गांगुली, सुनील ग्रोव्हर, गायक शंकर महादेवन यांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी केल्या आणि व्यापाऱ्यांसोबत सेल्फी काढून ते फोटो शेअर केले आहेत. माधुरी दीक्षितने रायपूरमधील स्थानिक दिव्यांच्या दुकानांमधून दिवाळीसाठी दिवे खरेदी केले आहेत. अभिनेत्री तृप्ती डिमरीने स्वदेशी बनावटीची चप्पल खरेदी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

सुनील ग्रोव्हरने लखनऊमधील एका दुकानातून गिफ्ट खरेदी केले आहे. शंकर महादेवन यांनी प्रयागराजमध्ये मिठाई खरेदी केली. या सर्वांनी स्थानिक व्यापाऱ्यांसोबत सेल्फी देखील काढली आहे. याचाच अर्थ चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी आता पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shankar Mahadevan (@shankar.mahadevan)

या कलाकारांनी स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीद्वारे PM मोदींच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या स्वप्नालाही हातभार लावला आहे. यापूर्वीही अनेक चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या लोकांसाठी उपयुक्त असणाऱ्या कांमाना पाठिंबा दिला होता. आताही कलाकार सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.