सांगलीत मित्रांनीच मित्राचा केला खून
दारू पिण्यावरुन मित्रांमध्ये झाला होता वाद
दगडाने ठेचून तरुणाला संपवलं
Sangli Crime News : सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दगडाने ठेचून तरुणाला संपवण्यात आले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. या हत्येच्या घटनेमुळे सांगलीच्या संजयनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या एका औद्योगिक वसाहतीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाचे नाव रोहित आवळे (वय २२ वर्षे) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दारू पिण्याच्या वादातून रात्रीच्या सुमारास तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दगडाने ठेचून रोहितचा जीव घेतला. हे हल्लेखोर त्याचेच मित्र असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप प्रवेश लटकला अन् सावंताचे मन बदललं, सोलापूरचं राजकारण ३६० डिग्री बदलणारदारू पित असताना रोहित आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून रात्रीच्या सुमारास मित्रांनी रोहितवर हल्ला केला, दगडाने ठेचून रोहितची निर्घृणपणे हत्या करण्यात आली अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEOसांगलीत एका तरुणाचा दगडाने ठेचून मारण्यात आले. हा तरुण मित्रांसह दारू पित होता, दारू पिण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला. दगडाने ठेचून या तरुणाला संपवण्यात आले. तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.
महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर