महापालिकेपूर्वीच अजितदादांना मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ, घेतला मोठा निर्णय
Tv9 Marathi October 19, 2025 04:45 AM

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांनी आप-आपल्या स्थरावर तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आला आहे, अनेक नाराज नेते आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आता महायुतीमधील नेते देखील महायुतीमधीलच एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच त्यांनी यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे.  मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे,  त्यामुळे आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे,  माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत, त्यामुळे ते देखील आमच्या निर्णयाशी सहमत आहेत. ते देखील आमच्यासोबत येतील, असा विश्वासही यावेळी पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणुकीच्या तयारीला सुरुवात 

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं कोणतंही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.