सोलापूर: चौघे रेल्वेने सोलापूर शहरात आले. दोन ठिकाणाहून दुचाकी आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली. कारमधून चोरी करायचे घर शोधले. अवंती नगरातील दोन घरांमध्ये चोरी केली. दागिने, रोकड घेऊन पसार झाले आणि चोरीची वाहने अंधारात सोडून पुन्हा ते बस व रेल्वेने पसार झाले. त्यातील दोघांना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा१० ऑक्टोबरच्या मध्यरात्री चौघांनी अवंती हाउसिंग सोसायटीतील दोन घरांमध्ये जबरी चोरी केली होती. गळ्याला चाकू लावून त्यांनी दोन्ही घरातील दागिने, रोकड चोरून नेली होती. तोंडाला मास्क लावून चौघेही चारचाकीतून पसार झाले होते. मेरबानसिंग मायासिंग दुधानी (वय ३४, रा. विजयपूर, कर्नाटक), हरेश विजयकुमार रामत्री (वय ३२, रा. बदलापूर, ठाणे) अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन दुचाकी, कार आणि एक सोन्याची अंगठी, काही रोकड असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.
पोलिसांना गुंगारा, तरीपण सापडलेच
चोरीच्या कारमधून फिरताना चोरटे रोड कनेक्टिव्हिटी (चोरी केल्यावर सहजपणे पळून जाता येईल असा रस्ता), सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे व कंपाउंड नसलेल्या अपार्टमेंटचा शोध घेत होते. जुना पूना नाक्याजवळील अवंती हाउसिंग सोसायटीवर त्यांची नजर पडली. त्यांनी चोरीचा प्लॅन बनविला. काही घरांच्या कड्या बाहेरून लावून दोन घरांना टार्गेट केले. अर्ध्या तासात चोरी करून कारमधून ते पसार झाले. चोरीची वाहने केगाव परिसरात अंधारात लावून तेथून रिक्षाने शहरात परतले. त्यामुळे ते सीसीटीव्हीत दिसले नाहीत. पोलिसांनी त्या रात्री शहरात आलेल्या रिक्षावाल्यांकडे चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला आणि तपासाची चक्रे फिरवून दोघांना जेरबंद केले.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! मुख्य सूत्रधार ७ वर्षांची शिक्षा भोगलेलाजबरी चोरीतील मुख्य सूत्रधार मेरबानसिंग दुधानी हा दरोड्याच्या गुन्ह्यात सात वर्षे जेलमध्ये होता. शिक्षा भोगून तो तीन महिन्यापूर्वीच बाहेर आला होता. त्यानंतर त्याने चोरीची गॅंग तयार करून सोलापुरात चोरी केल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.