पुणे सोने बाजार बातम्या: दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. देशभर या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज धनत्रयोदशी आहे. या निमित्त पुण्यातील सराफा बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत. सोन्याच्या भावांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी सुद्धा ग्राहकांचा कल सोना खरेदी असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी सराफा दुकानात गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोन हे धनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं आज दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीला सोन्याची पूजा केली जाते. त्यामुळं सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक विविध पाहायला मिळतात. सोन्याचे भाव 1 लाख 31 हजार 840 आहेत तर चांदीच्या भावात सुद्धा वाढ झाली असून चांदी 1 लाख 76 हजार 130 रुपये इतक्या दरावर आहे असं असलं तरी सुद्धा ग्राहकांकडून आजच्या दिवशी एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळते आहे. दिवाळीनिमित्त सोन्याचे वाढलेले भाव आणि आजचा कल कसा आहे याबाबत पुणे व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष फतेहचंद रांकायांनी माहिती दिली आहे. अमेरिका चीनमधील व्यापार तणाव, जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे .सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे, सणासुदीच्या काळात तसेच लग्नसराईत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एएनझेड बँकेच्या मते, पुढील वर्षी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. या वर्षीच्या विक्रमी उच्चांकी किमती भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, कमकुवत डॉलर आणि अमेरिकेतील व्याजदर कपात यामुळे आहेत. स्पॉट गोल्डने प्रति औंस $४,२२५.६९ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आणि नंतर ०.४ टक्क्यांनी वाढून $४,२२४.७९ वर पोहोचला.
जेव्हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता किंवा संकट असते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवतात. एएनझेडच्या अहवालानुसार, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे भाव प्रति औंस ४,४०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात, तर जून २०२६ पर्यंत ते सुमारे ४,६०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात.नंतर, पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत किमतींमध्ये मोठी घट अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा