IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोर
GH News October 18, 2025 07:10 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. अवघ्या काही तासात पहिला सामना होणार आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याची क्रीडारसिक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहात आहेत. कारण या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यानंतर पुन्हा खेळताना दिसणार आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच क्रीडारसिकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचं विरजण पडणार असं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये रविवारी पावसाची 63 टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सामन्याला सुरुवात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल. पण सामन्याच्या सुरुवातीला 50 ते 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ येऊ शकते. जर हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर रोहित-विराटच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

पर्थच्या ऑप्टस मैदानात टीम इंडिया पहिल्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानात तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड काही खास नाही. आतापर्यंत टीम इंडिया 54 सामने खेळली असून त्यातील फक्त 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 38 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

भारतीय संघात 9 वर्षानंतर अशी वेळ

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे नऊ वर्षांपासून वनडे संघाची धुरा होती. रोहित शर्मा 4 वर्षानंतर टीम इंडियात खेळाडू म्हणून दिसणार आहे. 2021 मध्ये त्याने विराटकडून ही धुरा हाती घेतली होती. यापूर्वी अशी स्थिती 2016 मध्ये आली होती. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.