Heart Health Tips: आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे ह्रदयविकाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव असून, त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अनेकांना हृदयात हलकी धडधड जाणवू लागते, अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धतीने हृदयाची प्राथमिक तपासणी करू पाहणे उपयुक्त ठरू शकते. यामुळे तुमच्या हृदयाची स्थिती लक्षात येईल आणि गरज भासल्यास तुम्ही त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.
Thailand Tour Package: थायलंडला फिरायला जायचं आहे? मग IRCTC चं 7 दिवसांचं खास टूर पॅकेज बुक करा आणि अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घ्या! नाडीची गती तपासनाडी म्हणजेच आपल्या हृदयाची गती. आरामाच्या स्थितीत नाडी दर प्रति मिनिट ६० ते १०० याच्या दरम्यान असायला हवा.
कसं कराल?डाव्या हाताच्या मनगटावर, अंगठ्याच्या खाली बोटं ठेवा.
१० सेकंदात किती ठोके होतात ते मोजा.
त्यास ६ ने गुणा करा. म्हणजे तुमचा Pulse Rate मिळेल.
काय काळजी घ्याल?नाडी दर १०० पेक्षा जास्त किंवा ६० पेक्षा कमी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा (खेळाडूंमध्ये अपवाद असू शकतो).
पायऱ्या चढण्याची चाचणी कराही एक घरगुती, पण प्रभावी चाचणी आहे. तुमच्या हृदयाची कार्यक्षमता आणि श्वासोच्छवासाची स्थिती याचं मूल्यमापन करतं.
कसं कराल?सलग ६० पायऱ्या (सुमारे ४ मजले) चढा.
ते करताना वेळ घ्या पण ९० सेकंदाच्या आत आणि दम न लागता पूर्ण व्हायला हवं.
काय लक्षात घ्याल?पायऱ्या चढताना दम लागणं, छातीत जडपणा, चक्कर येणं. ही लक्षणं हृदयविकाराची सुरुवात दर्शवू शकतात.
Dhanteras Rangoli 2025: धनत्रयोदशीच्या सायंकाळी पूजेच्या वेळी घरासमोर ही रांगोळी काढा; मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद स्मार्ट उपकरणांद्वारे हृदयावर लक्ष ठेवाआजकाल स्मार्टफोन, वॉच, फिटनेस बँड्समध्ये हृदयाचे ठोके, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी यांचे सेन्सर असतात.
फायदेसतत हृदयाचे ठोके तपासता येतात
व्यायाम, औषध, वजन याचे रेकॉर्ड ठेवता येतात
डॉक्टरांना माहिती शेअर करून तपासणीत मदत होते
पण लक्षात ठेवाही फक्त सहाय्यक साधनं आहेत. डॉक्टरांचा सल्ला कधीच पर्याय ठरू शकत नाही.