पिंपरी, ता. १८ ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी विविध शाळांमध्ये आवाहन केले आहे. यासंदर्भात काशीविश्वेश्वर इंग्लिश स्कूल, माउंट कॅमल पब्लिक स्कूल, मास्टर माईंड इंग्लिश स्कूल आणि माध्यमिक विद्यामंदिर मनपा या शाळांत मुख्याध्यापकांना पत्रे देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे यात सुचविण्यात आले आहे. शाळेतील मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याबद्दल आभार मानल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी सांगितले.
-----