मैरीलेबोन क्रिकेट क्लब आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी क्रिकेटला रंजक बनवण्यासाठी नवनवे नियम लागू करते. अशातच आता त्यांनी आणखी एक नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार फलंदाजांना स्टंम्पच्या मागे जाऊन शॉट खेळता येणार नाही. याचा फायदा गोलंदाजांना होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. आयसीसीचे माजी अंपायर अनिल चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनिल चौधरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या नव्या नियमाबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणाले, की आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, फलंदाजाला स्टम्पच्या मागे जाऊन शॉट खेळत येणार नाहीये, आयसीसीने हा नवा नियम लागू केला आहे. या व्हिडीओत त्यांनी प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांच्या मनात या नियमाबद्दल कुहूतूल निर्माण झालं आहे.
INDW vs AUSW: चुकीला माफी नाही! भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलंच, पण ICC नेही सुनावली शिक्षाअनिल चौधरी म्हणाले, नव्या नियमानुसार जर एकादा फलंदाज फलंदाजी करताना शॉट खेळण्यासाठी पूर्णपणे स्टम्पच्या मागे गेला आणि जर तो खेळपट्टीच्या बाहेर असेल तर, तो बॉल ‘डेड बॉल’ म्हणून घोषित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाने मारलेला हा शॉट ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच त्याच्या धावादेखील त्याला दिल्या जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे हा बॉल लीगल डिलिव्हरी मानली जाणार असून या बॉलवर जर फलंदाज बाद झाला, तर त्याला बाद दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...View this post on InstagramA post shared by Anil Chaudhary (@anilchaudhary.13)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अनेक खेळाडूंनी यापू्र्वी असा शॉट खेळला आहे. यावेळी फलंदाज गोलंदाजाला चकवण्यासाठी स्टम्पच्या मागे जाऊन शॉट खेळतो.वेस्टइंडीजचा दिग्गज खेळाडू काइरन पोलार्ड याला अनेकदा अशा प्रकारचे शॉट खेळताना पाहिलं गेलं आहे. गोलंदाजाला गोंधळात टाकण्यासाठी अशाप्रकारचा शॉट खेळला जातो. पण आता नव्या नियमामुळे आता फलंदाजांना हा शॉट खेळता येणार नाही.