Kolhapur Jilha Bank : परराज्यांतील म्हैस खरेदीसाठी 'केडीसीसी'ची नवी योजना
esakal October 21, 2025 10:45 PM

दृष्टिक्षेपात योजना...

कर्जफेड मुदत तीन ते पाच वर्षे. एका म्हशीसाठी दीड लाखाप्रमाणे दोन म्हशींसाठी

मिळणार तीन लाख कर्ज. फक्त घरठाण उताऱ्यावर मिळणार अर्थ पुरवठा.

बँकेकडून लाभार्थ्यास दिले जाणार रु. १० हजार अनुदान

Dhawalkranti Scheme KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेने परराज्यांतील दुधाळ म्हशींच्या खरेदीकरता धवलक्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरांनाही आर्थिक भांडवल मिळणार आहे. विशेष म्हणजे निव्वळ दूध संस्थांच्या आणि दूध संघाच्या हमीवर हा अर्थ पुरवठा होणार आहे. याबाबतचा निर्णय बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. निव्वळ घरठाण उताऱ्यावर हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजुरांना परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीकरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनतेतून अर्थसहाय्य मिळते. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या योजनांचा समावेश आहे.

Kolhapur Crime News : कोल्हापूर सीबीएस परिसरातील लॉजमध्ये गुजरातच्या व्यापाऱ्याने घेतला गळफास, तीन दिवस एकाच खोलीत...

माध्यमातून १२ टक्के व्याज परतावा व व्याज अनुदान कर्ज योजनेंतर्गत म्हशी खरेदी करण्याकरता योजना सुरूच आहे. या योजनेंतर्गत गोकुळ दूध संघ व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या हमीपत्रावर परराज्यांतील म्हशी खरेदीसाठी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण मंजूर करण्यात आले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.