पंढरपूर : अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. परिणामी या नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून त्यांची दिवाळी अंधारातच जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत दिली जाईल; असे आश्वासन सरकारने दिले होते. दिवाळी सण संपत आला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरीशासनाकडून देण्यात येत असलेल्या निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीकाकेंद्र सरकारच्या मदतीकडे बोट
सरकारकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकय्रांना सुमारे ९२७ कोटींच्या मदतीचा शासनाने जीआर काढला आहे. जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले असले तरी त्यांनी केंद्र ससरकारच्या मदतीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे सरकारची मदत कधी मिळणार याकडेच शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलनकृषिमंत्र्यांची कबुली
दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान केंद्र सरकारला नुकसान झालेल्या पंचनाम्याची अचुक माहिती द्यायची असल्याने थोडा उशीर होतो; अशी कुबलीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे.