-हरिदास कड
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा प्रश्न , पुणे नाशिक महामार्ग, तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाची प्रलंबित असलेली कामे, रोजचे अपघात त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेला कामगार, व्यावसायिक, उद्योजक ,विद्यार्थी, रुग्ण सारे अक्षरशः अनेक वर्षापासून वैतागले आहेत. अनेकवेळा आंदोलने झाली, मोर्चा झाला. परंतु यावर उपाय काही होतच नाही.
Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेधमार्गावर सांडपाणी वाहिनीची जी कामे होत आहेत .ती निकृष्ट दर्जाची आहेत कधी स्लॅब कोसळतो आहे त्यात मजूर अडकत आहेत. वाहने अडकत आहेत. कोट्यावधी रुपयांची कामे होऊनही काही फरक पडत नाही. या प्रश्नाकडे ,कामांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खरे लक्ष दिले पाहिजे .येथील कोणीच लक्ष देत नाही. राजकीय नेते लक्ष देत नाहीत त्यामुळे येथली अवस्था भीषण आहे. या समस्येकडे दादा तुम्हीच लक्ष द्या अशी अनेक उद्योजक ,व्यावसायिक, कामगार, कार्यकर्ते चाकणकरांची मागणी आहे.
खेड तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काही रस्त्यांची कामे जरी झाली तरी त्याच्यात ठेकेदारी आणि टक्केवारी या विषयामुळे कामे निकृष्ट होत आहेत. पुन्हा रस्त्यावर खड्डे आणि तेच प्रश्न ही समस्या वारंवार उद्भवते आहे. खेड तालुक्यात टक्केवारीत सगळे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. नागरिक ,कामगार ,व्यावसायिक , शेतकरी, विद्यार्थी ,उद्योजक सारेच वैतागले आहेत. औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची समस्या ही मोठी आहे. त्या रस्त्यावरही वाहने चालविणे ये जा करणे अवघड झाले आहे. हे प्रश्न कधी सुटणार अनेक वर्षे जातात टेंडर निघतात असे बोलले जाते .परंतु कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार हाच प्रश्न उद्योजक, कामगार ,व्यवसायिकांचा आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शिक्रापूर मार्गावर सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले ते कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पुणे नाशिक महामार्गावर अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते.
त्यात काही दुचाकी चालकांची दुचाकीही बुडाली होती. काही कारचालकांची वाहणे बंद पडली होती. नुकताच काल ता .१९ ला सकाळी साडेदहाच्या सुमारास सांडपाणी वाहिनीचा सिमेंटी स्लॅब कोसळला त्यात एक मजूर अडकला होता तो कसातरी वाचला. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहे. त्यामुळे याकडे पालकमंत्री,उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांनीच लक्ष द्यावे तर असे प्रश्न सुटतील अशी अनेक उद्योजक, कामगार, व्यवसायिकांची चाकणकरांची मागणी आहे.
Solapur Fraud:'शेअरमध्ये गुंतवून सीए सव्वादोन कोटींना फसले'; सोलापूर सायबर पोलिसांना मिळाली तीन खात्यांची माहितीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत जुलै महिन्यात पाहाणी केली होती. त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकाचे विस्तारीकरण थोडे झाले . विद्युत रोहित्र , खांब हलले गेले. परंतु मार्गाची महत्त्वाची कामे अजून बाकी आहे . त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलाच नाही."