Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर
Saam TV October 22, 2025 02:45 PM

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

वाशी सेक्टर 14 मधील एमजीएम कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीचं कारण समोर आलं आहे. दिवाळीच्या रोषणाईत झालेल्या शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहाव्या मजल्यावरील 80 वर्षांचे वृद्ध महिलेसह बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या 40 वर्षीय पूजा राजन तिचे पती 40 वर्षीय सुंदर पालक कृष्णन व त्यांची सहा वर्षाची चिमुकली वेदिका या तिघांचा या आगीत मृत्यू झाला आहे. . तसेच एक दांपत्य यांचा समावेश आहे.

रहेजा रेसिडेन्सी या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. सुसाट वाऱ्यामुळे आग 11 व्या आणि 12 व्या मजल्यावरही पसरली. अकराव्या मजल्यावरील तीनही कुटुंबीयांनी वेळेत इमारतीबाहेर धाव घेतली. मात्र 12 व्या मजल्यावर राहणारे सुंदर कृष्णन (45), पूजाआणि त्यांची 10 वर्षांची मुलगी बैठका यांनी घरातील बाथरूममध्ये आसरा घेतल्याने गुदमरून मृत्यू झाला.

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

आग तीन तासांहून अधिक काळ धगधगत होती. घटनास्थळी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. पालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. प्राथमिक तपासात इमारतीत व्हेंटिलेशनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे शहरातील सर्व उंच इमारतींच्या व्हेंटिलेशन आणि सुरक्षा ऑडिटची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या घटनेत सुमारे दहा जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचीमाहिती पोलिसांनी दिली आहे.

Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.