सचिन बनसोडे
संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार नावांमध्ये दोष आढळून आला. या नावांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही. तहसीलदार म्हणतात नावं वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही. एका बाजूला चुका दुरुस्त करू असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला आम्हाला अधिकार नसल्याचे सांगतात. अर्थात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोग बनवाबनवीचा कार्यक्रम करत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी थोरात सहकारी साखर कारखाना स्थळावर कुटुंबियांसमवेत विधिवत लक्ष्मीपूजन केले. दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांमुळे संगमनेरचेअर्थकारण चांगले असून अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आम्ही त्यांच्या दुःखात देखील सहभागी आहे. दीपावली हा प्रेमाचा, बंधुभावचा सण. इथे द्वेषाला जागा नाही. मनातील द्वेष, मत्सर बाजूला ठेऊन अंतःकरण शुद्ध करण्याचा सण असल्याचे म्हटले.
Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशाराकर्जमाफीवरून राज्य सरकारवर निशाणा
सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मात्र ते कर्जमाफीचे आश्वासन विसरले आहेत. ही वेळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची असून तुम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र आता तुम्हाला ते आठवत नाही. विरोधकांनी कर्जमाफीची अपेक्षा करणे चुकीचे नाही. दिवाळीपर्यंत मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप तशी परिस्थिती दिसत नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेहबच्चू कडूंची पाठराखण
बच्चू कडू यांचे बोलणे शब्दशः घेऊ नका. आमदारांनी सरकारवर दबाव टाकला, तर कर्जमाफी लवकर होऊ शकते. तुमच्यावर जबाबदारी आहे, हा संदेश आमदारांना देण्यासाठी कडूंचे वक्तव्य असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांच्याकडून बच्चू कडू यांची पाठराखण करण्यात आली आहे.