- rat२०p१८.jpg-
२५N९९८५१
रत्नागिरी ः आली लहर केला कहर ग्रुप झाडगाव येथे १८ फुटी अतिभव्य अशा नरकासुराचे दहन करण्यात आले.
रत्नागिरीत १८ फुटी नरकासुराचे दहन
ढोल ताशांचा गजर ; बचतगटांच्या उत्पादनांना पसंती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः दिवाळीचा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करून क्रुरता आणि राक्षसी वृत्तीचा सर्वनाश करण्याच्या हेतूने, धर्माच्या उद्धारासाठी प्रौराणिक कथेमध्ये नरकासुर राक्षसाचे दहन करण्यात आले. त्याला अनुसरून झाडगाव येथे १८ फुटी भव्य अशा नरकासुराचे दहन करण्यात आले.
दीपावलीच्या पूर्वरात्रीला आली लहर केला कहर ग्रुप झाडगाव (भैरी सहाण) येथे ढोल ताशांच्या गजरात नरकासुराचे दहन करून समाजात सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नरकासुराची प्रतिकृती साकार करण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागले. या ग्रुपचे सर्व मुलांनी मेहनत घेतली.
यंदाही दिवाळीच्या फराळासह आकाश कंदील, पणत्या, उटणे, दिवाळी कीट तयार करून विक्री करण्यात महिला आघाडीवर आहेत. देवघरातील पूजेपासून माहेरच्या फराळाच्या डब्यापर्यंत सर्वत्र बचतगटाच्या उत्पादनांनी स्थान मिळवले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारचे आकाशकंदील अनेकांच्या घरामध्ये दिवाळीची शोभा वाढवत आहेत. बाजारपेठेत महिला बचतगटांनी तयार केलेल्या पणत्या, दिवाळी किटची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत आहे. तसेच बाजार पेठेतून मिठाईला देखील मोठ्या प्रमाणात मागणी होती. ग्राहकांमधून महिला उद्योजिकांच्या या उत्पादनांना पसंती देण्यात आली. महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारचे आकाशकंदील अनेकांच्या घरामध्ये दिवाळीची शोभा वाढवत आहेत.