अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी एक मोठी डील झाली आहे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या करारावर स्वाक्षरी केली. रेअर अर्थ मिनरल्सशी संबंधित ही डील आहे. वेगवेगळे इलेक्ट्रिक वाहनांचे पार्ट बनवण्यासाठी तसेच जेटचं इंजिन आणि इतर संरक्षण क्षेत्रातील उपकरणं बनवण्यासाठी या रेअर अर्थ मिनरल्सचा उपयोग होतो.
याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगीतलं की, आमची सलग पाच ते सहा महिने चर्चा सुरू होती, पाच ते सहा महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर हा करार फायनल झाला आहे. या करारावेळी दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये व्यापर, सुरक्षा उपकरण आणि पाणबुडी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या कराराची एकूण किंमत 8.5 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 71,000 कोटी रुपये असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी दिली आहे. आता या करारानंतर दोन्ही देशांकडून मायनिंग आणि प्रोसेसिंग प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. सोबतच रेअर अर्थ मिनिरल्सची किंमत देखील निश्चित करण्यात आली आहे.
या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे, कारण चीन अमेरिकेला आधी रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा करत होता, मात्र त्यानंतर अचानक चीनने ही निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला, याचा अमेरिकेला मोठा फटका बसला. कारण अमेरिका रेअर अर्थ मिनिरल्ससाठी आधी पूर्णपणे चीनवर अवलंबून होते, मात्र चीनने ही निर्यात बंद केल्यानंतर आता अमेरिकेनं ऑस्ट्रेलियासोबत नवी डील केली आहे.
भारताला होणार फायदा
दरम्यान तज्ज्ञांच्या मते या नव्या डीलमुळे भारताची बार्गेनिंग पावर देखील वाढू शकते, भारत हा रेअर अर्थ मिनिरल्ससाठी चीनवरच अवलंबून आहे. मात्र नव्या डीलमुळे अमेरिकेचं चीनवरील अवलंबित्व कमी होणार असल्यानं याचा फायदा भारताला होऊ शकतो, भारत चीनसोबत नव्यानं डील करू शकतो. या नव्या डीलमुळे आता अमेरिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रम्प यांचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.