Spiritual Hill Destinations in India: मनःशांती आणि भक्तीचा संगम शोधताय? ही डोंगरावरील तीर्थस्थळं तुमच्यासाठीच आहेत बेस्ट
esakal October 22, 2025 04:45 AM

Spiritual Hill Destinations in India: दिवसभराची धावपळ, सततच्या मिटिंग्स, ट्रॅफिकमधला वेळ आणि मग घरी पोहोचेपर्यंत थकलेलं शरीर... आजच्या जीवनशैलीत "वेळ नाही" हे वाक्यच अनेकांकडून ऐकायला मिळते.

याच व्यापात आपण अनेकदा कुटूंबाला वेळ देणंमी एकत्र फिरणं, किंवा निसर्गाशी स्वतःशी जोडणं विसरतो. पण एखादी सुट्टी विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या काळात ही संधी ठरू शकते. जर तुम्ही यंदाच्या दिवाळी सुट्टीसाठी तीर्थयात्रेचं प्लॅनिंग करत असाल, उत्तर भारतामधील या अध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.

Lakshmi Puja Muhurat 2025: आजच्या लक्ष्मीपूजनात कोणत्या वेळेला कराल पूजा? जाणून घ्या शुभ काळ आणि सर्वोत्तम मुहूर्त

उत्तर भारतातील हिमालय ते दक्षिणेतील खडकाळ रांगा, हे सर्व प्रदेश देव- देवतांच्या, ऋषी-मुनिंच्या आणि साधकांच्या कथा-पुराणांशी घट्ट जोडले गेले आहेत. काहीजण येथे देवळांना भेट देण्यासाठी, गुहांमध्ये ध्यानधारणा करण्यासाठी किंवा फक्त त्या ठिकाणची शांतता अनुभवण्यासाठी येतात. हे डोंगरी स्थळं निसर्गसौंदर्याबरोबरच अंतर्मुख होण्यासाठी आणि सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्यासाठी आदर्श आहेत.

गिरनार पर्वत, गुजरात

गुजरातमधील जुनागढ जवळचा गिरनार पर्वत हा एक अत्यंत श्रद्धास्थान आहे. येथे चढण्यासाठी सुमारे ९,००० पायऱ्या चढाव्या लागतात. हिंदू आणि जैन धर्मीयांसाठी हे स्थान फार महत्वाचे आहे. येथे भगवान दत्तात्रेय यांचं मंदिर तसेच अनेक जैन तीर्थंकरांची मंदिरे आहेत. डोंगर शिखरावरून दिसणारा सूर्योदयाचा नजारा आणि सभोवतालची निसर्गरम्यता एक वेगळाच अनुभव देते.

शत्रुंजय डोंगर, पालिताना (गुजरात)

जैन धर्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या शत्रुंजय डोंगरावर सुमारे ८०० हून अधिक जैन मंदिरे आहेत. या मंदिरांपर्यंत पोहोचण्यासाठी ३,५०० पायऱ्या चढाव्या लागतात. इथला प्रत्येक चरण एकप्रकारची तपश्चर्या मानला जातो. भक्तीभावाने केलेली ही यात्रा मोक्षप्राप्तीचे साधन मानली जाते.

SSC CPO Final 2024 निकाल जाहीर; राज्यातून ५ हजाराहून अधिक उमेदवारांची निवड अरुणाचल पर्वत, तामिळनाडू

तिरुवण्णामलई जवळ असलेला अरुणाचल डोंगर हा भगवान शिवाचा अग्निरूप असा मानला जातो. येथे दर पौर्णिमेला हजारो भक्त १४ किलोमीटर लांब परिक्रमा (गिरिवलम) करतात. हा डोंगर ध्यान, साधना आणि मौन साधनेसाठी ओळखला जातो. येथील शांत आणि आध्यात्मिक वातावरण ध्यानसाधकांसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.

माउंट आबू, राजस्थान

राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन असलेलं माउंट आबू हे एक प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. येथे असलेली दिलवाडा जैन मंदिरे ही संगमरवरी कोरीवकामाची अनमोल उदाहरणं आहेत. या मंदिरांचे सौंदर्य, तिथली शांतता आणि माउंट आबूच्या थंड हवामानामुळे येथे धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाची एक अप्रतिम सांगड अनुभवायला मिळते.

रत्नगिरी डोंगर, आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील रत्नगिरी डोंगरावर वसलेलं बाला त्रिपुरा सुंदरी मंदिर हे देवीच्या बाल रूपातील उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रासारख्या सणांमध्ये येथे हजारो भाविक एकत्र येतात. डोंगरावरून दिसणारा परिसर शांततेचा अनुभव देतो, आणि मंदिर परिसरात होणारी पूजाअर्चा भक्तीची अनुभूती वाढवते.

चामुंडी हिल्स, कर्नाटक

मैसूर शहराला वाचणाऱ्या चामुंडी टेकड्या या चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. देवीने येथे महिषासुराचा वध केल्याची कथा सांगितली जाते. १,००० पायऱ्यांचा चढ पार करताना भाविकांना प्रचंड नंदीची मूर्ती दिसते, जी देखील एक प्रमुख आकर्षण आहे. डोंगरावरून मैसूर शहराचे विहंगम दृश्य नक्कीच पाहण्यासारखे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.