दिवाळीनिमित्त टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणत आहेत. अशातच आता सरकारी कंपनी बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना आता चांदीचा कॉईन जिंकण्याची संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे या ऑफर्सचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन बीएसएनएलतर्फे करण्यात आलं आहे.
हा चांदीचा कॉईन जिंकण्यासाठी ग्राहकांना केवळ १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रिचार्ज करावा लागणार असून हा रिचार्ज बीएसएनएलच्या अॅप किंवा वेबसाईटवरून करावा लागणार आहे. ही ऑफीस १८ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत ग्राहकांना चांदीचा १० ग्रॅमचा कॉईन दिला जाणार आहे.
Diwali Recharge Offer : दिवाळी स्पेशल 1 रुपयचा रिचार्ज! रोज 2GB डेटा, कॉलिंग, SMS अन् महिन्याची वैधता, बड्या कंपनीने आणली धमाका ऑफरकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दररोज १० ग्राहकांना हा कॉईन दिला जाणार आहे. हा ड्रॉ १८, १९ आणि २० ऑक्टोबरला होत असून आज शेवटचा दिवस आहे. जुन्या आणि नवीन अशा दोन्ही ग्राहकांसाठी ही ऑफर लागू आहे. यासंदर्भात बोलताना, ही ऑफर ग्राहकांच्या दिवाळीच्या आनंदात भर घालेल, अशी प्रतिक्रिया बीएसएनएलचे सीएमडी यांनी दिली.
Diwali Offer: Vi चे युजर्सना दिवाळी गिफ्ट; मोबाईल रिचार्जवर मिळतोय 75 जीबी फ्री डेटा अन् बरंचबीएसएनएल व्यतिरिक्त रिलायन्स जिओने, वोडाफोन आयडीया यांनीही त्यांच्या ग्राहकांनासाठी विविध ऑफर्स आणल्या आहेत.जिओने ३४९, ३५९९, ८९९, ९९९, ३५९९, ३९९, ८५९, ७४९, ७१९, ६२९, ११९९ आणि ४४९ रुपयांच्या रिचार्जवर तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाइल/टीव्ही सबस्क्रिप्शन आणि ५० जीबी एआय क्लाउड स्टोरेजची सुविधा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. या ऑफर्समुळे टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे.