सांगोला : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सांगोला नगरपरिषदेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) ताकदीने लढवणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवामुंबई येथे मंत्री दादासाहेब भुसे यांच्या जंजिरा बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत सांगोला तालुक्याच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, ‘सांगोला नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही ताकदीने लढवू. कार्यकर्त्यांना न्याय देऊन सांगोला तालुक्याला विजयश्री मिळवून देऊ.’
सांगोला तालुक्याच्या वतीने प्रा. संजय देशमुख यांनी नगरपालिका विभागाचा आढावा सादर केला. या बैठकीस युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, गटनेते आनंदा माने, उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, युवासेना प्रमुख गुंडादादा खटकाळे, तसेच दीपक दिघे, आनंदा घोंगडे, प्रशांत धनवजीर, अस्मिर तांबोळी, माऊली तेली, सोमेश यावलकर आदी उपस्थित होते.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! शहाजी पाटलांवर विश्वासखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शहाजीबापूंवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, ‘शहाजीबापू आमचे नेते असून, त्यांच्या पाठिशी शिवसेना आणि शिंदे कुटुंब पूर्ण ताकदीने उभे राहील.’ बैठकीत आमदार विजय शिवतारे यांनी सांगोला तालुक्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. पक्षाचे सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, नीलम गोरे आदी उपस्थित होते.