H-1B Visa च्या तगड्या फी पासून हवी सुटका ? असा करू शकता अर्ज, नवे अपडेट्स काय
GH News October 22, 2025 01:10 PM

साधारण महिन्याभरापूर्वी अमेरिकन प्रशासनाने H-1B Visa चे शुल्क वाढवून 1 लाख डॉलर्स केल्यान जगभरात मोठा गदारोळ माजला होता. अनेक जण पॅनिक झाले. मात्र काळ पुढे सरकत गेला, तसतसे त्यात नवे अपडेट्स समोर आले . आता अमेरिकन सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिस (USCIS) ने नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. एच-1बी व्हिसा अर्जांसाठी एम्प्लॉयर्सनला 1 लाख डॉलर्सचे शुल्क कधी भरावे लागते आणि ते सूट कशी मिळवू शकतात हे त्यात नमूद करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी व्हाईट हाऊसने जारी केलेल्या घोषणेनंतर हे स्पष्टीकरण आले आहे. त्यावेळी अमेरिकेत बाहेरून आलेल्या, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दाखल केलेल्या नवीन H-1B याचिकांवर एक-वेळ शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती.

कधी भरावी लागेल 1 लाख डॉलर्सची फी ?

हे शुल्क 21 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर दाखल केलेल्या नवीन H-1B याचिकांवर लागू होईल, जे कर्मचारी अमेरिकेबाहेर राहतात किंवा ज्यांना त्यांच्या याचिका मंजूर होण्यापूर्वी देश सोडावा लागेल. हे एकदाच भरावे लागणारे अतिरिक्त शुल्क आहे, जे नियमित H-1B फाइलिंग आणि प्रक्रिया शुल्कापेक्षा वेगळे आहे. USCIS नुसार, कार्यक्रमाचा गैरवापर रोखणे आहे हा या शुल्काचा उद्देश आहे, ज्यामुळे अमेरिकन नियोक्ते तंत्रज्ञान, संशोधन आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात कुशल परदेशी व्यावसायिकांना कामावर ठेवू शकतात.

कोणाला मिळाली सूट ?

व्हॅलिट नॉन-इमिग्रंटस स्टेटस नुसार, अमेरिकेत आधीच परदेशी कामगारांना, ज्यात H-1B मध्ये रूपांतरित होणाऱ्या F-1 विद्यार्थी व्हिसा धारकांचा समावेश आहे, त्यांना 1लाख डॉलर्सचे शुल्क भरावे लागणार नाही. ज्या लोकांना अमेरिकेत आधीच वैध दर्जा आहे, उदा – एच-1बी मध्ये रूपांतरित झालेले एफ-1 विद्यार्थी किंवा एच-1बी कामगार जे त्यांचा मुक्काम वाढवत आहेत – त्यांना या शुल्कातून आपोआप सूट मिळेल.

“अमेरिकेतील एखाद्या परदेशी व्यक्तीला संशोधन, स्टेटस चेंज किंवा राहण्याची मुदत वाढवण्याची विनंती करणाऱ्या कोणत्याही याचिकेवर ही फी लागू होणार नाही असे USCISने स्पष्ट केले.

कोण करू शकतं अप्लाय ?

कर्मचाऱ्याची उपस्थिती राष्ट्रीय हितासाठी आहे आणि या पदासाठी कोणतेही पात्र अमेरिकन कामगार उपलब्ध नाहीत हे परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन H-1B याचिका दाखल करणारे नियोक्ते जर सिद्ध करू शकले तर ते सूट मागू शकतात.

गरजेची कागदपत्रं

– अमेरिकेच्या राष्ट्रीय हितासाठी अर्जदाराची भूमिका कशी आहे हे स्पष्ट करणारे एक औपचारिक पत्र.

– या कामासाठी कोणतेही अमेरिकन कामगार उपलब्ध नाहीत किंवा पात्र नाहीत याचा पुरावा.

– नियुक्त केलेल्या परदेशी कामगाराने H-1B च्या सर्वपात्रता आणि प्रमाणपत्र आवश्यकता पूर्ण केल्याचा पुरावा.

– (कर्मचाऱ्याचे) भरती रेकॉर्ड, उद्योग प्रमाणपत्रे किंवा सार्वजनिक आरोग्य, वैज्ञानिक संशोधन किंवा शिक्षण यासारख्या आवश्यक सेवांमध्ये भूमिका योगदान देते हे दाखवणारे पुरावे – हे आवश्यक ठरतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.