निमगाव केतकी, ता. २१ : बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेत शेळगाव (ता. इंदापूर) येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील सागर ननवरे, सुनील वाघमोडे व प्रीती मोहिते या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या तिघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत थाळी फेक प्रकारात १९ वर्षे वयोगटात सागर ननवरे तर १७ वर्षे वयोगटात सुनील वाघमोडे याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, मुलींमध्ये १९ वर्षे वयोगटात हातोडा फेक स्पर्धेत प्रीती मोहिते हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भिमराव जाधव, प्राचार्य संदीप जाधव, क्रीडा शिक्षक सोखंडे व मंगेश वाघ यांनी तिघांचे अभिनंदन केले.