सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
Marathi October 23, 2025 12:25 AM

मुंबई : सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरु झाली आहे. या घसरणीत आणखी वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे. यानंतर तज्ज्ञांकडून 23 ऑक्टोबरला भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्याचा अंदाज वर्तवत आहे. ही घसरण काही काळ असू शकते असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.

भारतीय बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरानं 17 ऑक्टोबर 2025 ला उच्चांक गाठला होता. तेव्हापासून चांदीचे दर 20 हजार रुपयांनी घटले आहेत. तर, सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाली आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही घसरण अधिक असू शकते. कारण 2 दिवसांपासून जागतिक स्तरावर सोने आणि चांदीचे दर घसरले  आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज सणांमुळं बंद आहे.

12 वर्षातील मोठी घसरण

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. इंट्राडे दरम्यान सोन्याचे दर 6.3 टक्क्यांनी घसरले. चांदीचे दर इंट्राडेमध्ये 7.1 टक्क्यांनी घसरले. ही 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण होती.  बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात पाच वर्षातील मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यापारी स्तरावर जोरदार नफा वसूल केला जात असल्यानं ही घसरण झाली आहे.

लंडन ट्रेडिंगमध्ये सोन्याचे दर 4100 डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. मंगळवारी ही घसरण 5 टक्क्यांची होती. चांदीच्या दरात अशाच प्रकारची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं बुधवारी 4096 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. तर चांदीचे दर 48 डॉलरवर आले आहेत.

दिवाळीनंतर मोठी घसरण

तज्त्रांच्या अंदाजानुसार ही घसरण दिवाळीच्या सणानंतर होत आहे. भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आसते. अखिल भारतीय  रत्न आणि दागिने देशांतर्गत परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्या मते सोन्याच्या दरात एकतर्फी तेजी गेल्या चार महिन्यात पाहायला मिळाली होती. सोन्याचे दर 3300 डॉलर प्रति औंसवरुन ते 4400 डॉलर प्रति औंसवर पोहोचला होता. घसरण तर होणार आहे.तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सध्याची वेळ धैर्य ठेवण्याची आहे. सोने आणि चांदीच्या दरा गुंतवणूक केली असल्यास घसरणीच्या काळात धैर्य ठेवावं, असं तज्ज्ञांनी म्हटलं.

भारतात सोन्याचे एका तोळ्याचे दर 1 लाख 30 हजारांवरुन  1 लाख 28 हजारांवर आले आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 12 टक्के घसरण झाली आहे. यंदा सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.