सोलापूर : शहरातील ६७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांना एकेदिवशी व्हॉट्सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेल्यांचे अनुभव त्याठिकाणी पाहायला मिळाले. त्यातून त्यांनी सुरवातीला एक लाख रुपये गुंतवले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना चार-पाच दिवसांत २५ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर ‘सीए’नी दीड महिन्यात दोन कोटी २८ लाख रुपये गुंतवले, पण त्यांना एक रुपयाही परत मिळाला नाही.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवाश्रीगोंदे नामक ‘सीए’ची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या ऑनलाइन फिर्यादीवरून सायबर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘सीए’नी गुंतवलेली रक्कम एकूण सात खात्यात वर्ग केली होती. त्यातील तीन खात्यांची माहिती सोलापूर शहर सायबर पोलिसांनी मिळविली आहे. पुणे, राजस्थान व अकोला येथील ती खाती आहेत.
दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी विश्वास पटवा म्हणून श्रीगोंदे यांना एक लाख रुपयाला २५ हजार रुपयांचा परतावा दिला होता. विश्वास पटल्याने त्यांनी सायबर गुन्हेगार सांगतात तशी रक्कम गुंतवली. दोन कोटी २८ लाख रुपये दीड महिन्यात गुंतवल्यावर त्यांना आभासी स्वरूपात त्या रकमेचे ३४ कोटी रुपये झाल्याचे दिसत होते. त्यांनी रक्कम काढून घेण्याचा पर्याय निवडला, त्यावेळी त्यांना त्या रकमेवरील टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले.
त्यावेळी त्यांनी स्वत:ची रक्कम तरी काढून घेता येईल का, अशी विचारणा केली. तेव्हा ती रक्कम देखील त्यांना काढता आली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.
Sangola News: 'मोर्चेबांधणीसाठी सांगोल्यातील पदाधिकारी श्रीकांत शिंदेंच्या भेटीला'; मंत्री दादासाहेब भुसेंच्या बंगल्यावर पार पडली बैठक अशी झाली फसवणूकसुरवातीला सीए श्रीगोंदे यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून लिंक पाठविण्यात आली. त्यावर क्लिक करताच त्यांना शेअर मार्केटच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात आले. त्यावर सायबर गुन्हेगारांच्याच लोकांचे जास्त लाभ मिळाल्याचे अनुभव होते. आपल्यालाही एवढी मोठी रक्कम कमावण्याची संधी असल्याचा समज करून सुरवातीला ‘सीए’नी एक लाख रुपये गुंतवले. त्यांना तातडीने २५ हजार रुपयांचा परतावाही दिला. त्यानंतर मात्र सव्वादोन कोटी गुंतवले, पण एक रुपयाही परत मिळाला नाही.