भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना एडलेडमधील ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीकडे लक्ष असेल. या मैदानात विक्रम रचण्याची विराट कोहलीकडे शेवटची संधी आहे. आहे. शतकी खेळी करताच विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम रचला जाणार आहे. (Photo: PTI)
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रचण्यासाठी विराट कोहलीला आणखी एका विक्रमाची गरज आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकताच विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर सर्वाधिक शतकं करणारा विदेशी फलंदाज ठरणार आहे. (Photo: PTI)
विराट कोहली आणि इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांच्या नावावर सध्या हा विक्रम संयुक्तरित्या आहे. जॅक हॉब्सने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कसोटीत पाच शतके झळकावलीआहे. आता विराटला त्यांना मागे टाकून पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. (Photo: PTI)
विराट कोहलीने एडलेड ओव्हल मैदानात 5 शतकं ठोकली आहेत. यात विराट कोहलीने वनडेत 2 आणि कसोटीत तीन शतकं झळकावली आहेत. यासह जॅक हॉब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावताच हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल. (Photo: PTI)
विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या एकाच मैदानात 1000 धावा करणारा पहिला विदेशी फलंदाज होईल. यासाठी विराट कोहलीला फक्त 25 धावांची गरज आहे. एडलेडमध्ये 17 डाव खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 975 धावा केल्यात. (Photo: PTI)
विराट कोहली पहिल्या वनडे सामन्यात फेल गेला होता. त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला होता. आता दुसऱ्या वनडे सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून असणार आहे. (Photo: PTI)