Air India Himroo design : 'हिमरू'चा साज, बोइंग विमानाच्या शेपटीवर; एअर इंडियाकडून छत्रपती संभाजीनगरच्या कलेचा गौरव
Sarkarnama October 22, 2025 10:45 PM
Air India Himroo design 'हिमरू' काय आहे?

पर्शियन नजाकत आणि भारतीय कलाकुसर, असा अफलातून संयोग असलेले ‘हिमरू’ वस्त्र छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे.

Air India Himroo design 'बोइंग'वर साज

'हिमरू'च्या डिझाइनचा वापर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ताफ्यातील बोइंग 737 विमानाच्या शेपटीवर करण्यात आला.

Air India Himroo design कला अन् वारसा

कला आणि वारसा ज्या छत्रपती संभाजीनगरात आहे, याच शहराने 'हिमरू'च्या माध्यमांतून अनेक शतके वस्त्रकलेच्या इतिहासात आपले स्थान निर्माण केले.

Air India Himroo design सांस्कृतिक देणगी

फुलांच्या वेली आणि जाळी पॅटर्न हे वैशिष्ट्य असलेली 'हिमरू' वीणकला हे छत्रपती संभाजीनगरच्या हिमरू वीणकरांची कला आणि अनेक शतकांची सांस्कृतिक देणगी आहे.

Air India Himroo design 'एअर'कडून कौतुक

ही कला सर्वांनाच भूतकाळाशी जोडणारी असल्याने या अजोड कलेचा सन्मान म्हणून बोइंग विमानाच्या शेपटीवर 'हिमरू'चे डिझाइन वापरण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

Air India Himroo design 'बोइंग'वर कोणतं डिझाइन

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बोइंग विमानावरील 'हिमरू'ची डिझाइन ही अजिंठा लेणी क्रमांक 2 मधील मंडला आर्ट आहे, अशी माहिती हिमरू फॅब्रिकचे संचालक फैजल कुरेशी यांनी दिली.

Air India Himroo design 'हिमरू'चा इतिहास

मोहम्मद तुघलकाने इसवी सन 1326 मध्ये दिल्लीहून दौलताबाद म्हणजे, देवगिरीला स्थलांतर केले. त्यात हस्तकौशल्याचे काम करणाऱ्या कुशल कारागिरांचाही समावेश होता.

Air India Himroo design हस्तकलेचं केंद्र

औरंगजेबच्या काळात हे कारागीर दौलताबादहून छत्रपती संभाजीनगरला आले. या काळात शहर हस्तकलेचे प्रमुख केंद्र झाले.

Air India Himroo design राजेशाही वस्त्र

पर्शियन नजाकत आणि भारतीय कलाकुसर, असा अजोड संगम असलेले 'हिमरू' वस्त्र हे राजेशाही वस्त्र म्हणून ओळखले जाते, ते आता अवघ्या जगाचे झाले आहे.

NEXT : आरोग्य योजनांसाठी वॉर रूम... येथे क्लिक करा :
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.