रोहित शर्मा पर्थ वनडेमध्ये अपयशी ठरला. आता एडिलेड वनडेआधी रोहित शर्माच्या बाबतीत सर्वांनाच हैराण करुन सोडणारी बातमी समोर आलीय. असं म्हटलं जातय की, रोहित शर्मा मोठ्या अडचणीत आहे. टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन दरम्यान रोहित शर्मा खूप बदललेला दिसला. तो आधीसारखा वाटला नाही. एकटा-एकटा दिसत होता. रोहित शर्मा नेट्स सेशन दरम्यान सहकारी खेळाडू, मिडिया किंवा फॅन्ससोबत काही ना काही बोलताना दिसतो. पण यावेळी असं नव्हतं. एडिलेडमध्ये एक दृश्य दिसलं, त्यावरुन असा अंदाज बांधला जातोय की, रोहित शर्माच इंटरनॅशनल करिअर आता काही दिवसांचच राहिलय.
एडिलेड वनडे आधी प्रॅक्टिस दरम्यान यशस्वी जैस्वालसोबत हेड कोच गौतम गंभीर, चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि सिलेक्टर शिवसुंदर दास यांनी भरपूर चर्चा केली. यशस्वी जैस्वालसोबत सकारात्मक चर्चा झाली. खास बाब म्हणजे रोहित शर्मा प्रॅक्टिस ग्राऊंड सोडून गेल्यानंतर ही चर्चा झाली. यशस्वी जैस्वालला मंगळवारी खूप उशिरापर्यंत प्रॅक्टिस दिली. आता प्रश्न हा आहे की, रोहित शर्माच्या जागी यशस्वी जैस्वाल उतरणार आहे का?. सिलेक्टर्सनी रोहित शर्माला संदेश दिलाय का, की, एडिलेड वनडे तुझ्या करिअरमधील शेवटचा सामना असेल?. अजूनपर्यंत या बद्दल समजलेलं नाही. रोहितची बॉडी लँग्वेज हेच सांगतेय.
दुसरी वनडे कधी?
RevSportz Global च्या रिपोर्टनुसार रोहित शर्माचा एडिलेडमध्ये मूड खूप खराब दिसला. रोहित आधी सारखा अजिबात वाटत नव्हता. रोहित शर्माला आपली कॅप्टनशिप सोडायची नव्हती. पण सिलेक्टर्सनी आपला निर्णय घेतला. त्यानंतर शुबमन गिलला कॅप्टन बनवलं असा दावा केला जातो. रोहित शर्मा पर्थ वनडेमध्ये अपयशी ठरला. पण आता त्याला एडिलेड वनडेमध्ये धावा बनवाव्या लागतील. हा सामना गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरु होईल. रोहित शर्मा भारताचा प्रतिभावान खेळाडू आहे. पण सध्या 2027 वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन संघाची बांधणी सुरु आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन खेळाडूंना फिट बसायचं असेल, तर परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल.