मारुती सुझुकीच्या डिझायरची बाजारात अशी जादू चालली आहे की तिच्या समोर अनेक मॉडेल फिक्या पडल्या आहेत. पाहायला गेले तर डिझायर एक सेडान कार आहे. तरीही ती ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहे. वास्तविक आर्थिक वर्षे २०२६ च्या आधी सहा महिन्यांदरम्यान एप्रिल ते सप्टेंबर २०२५ पर्यंत ही देशाची एकमात्र अशी कार आहे जिची विक्री १ लाख युनिटच्या वर पोहचली आहे.
दुसरीकडे हुंडई क्रेटा ९९ हजार युनिट विक्री सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नेक्सन ही कार तिसऱ्या क्रमांकावर आहे. खास बाब म्हणजे मारुती वॅगनआरची जादू थोडी फिकी पडली आहे. तर स्विफ्ट आणि बलेनो सारखे मॉडेल खूपच दूर गेले आहेत. चलार तर एकदा FY26च्या सहा महिन्यात टॉप-3 मॉडेल कोणते आहेत ?
नव्या डिझायर तिच्या अग्रेसिव्ह फ्रंट बंपर, हॉरिजॉन्टल DRLs सह स्टायलीश LED हेडलाईट्स अनेक हॉरिजॉन्टल स्लॅट्ससह एक रुंद ग्रिल आणि नव्याने डिझाईन केलेल्या फॉग लँप हाऊसिंगसह सर्वात वेगळी आहे. तरीही याचा सिल्हूट आधीच्या मॉडेल सारखा आहे. या सेडानची शोल्डर लाईन आता जास्त उंच आहे. अन्य फिचर्समध्ये शार्क फिन एंटीना, बुट लिड स्पॉयलर आणि क्रोम स्ट्रीपशी जोडलेली Y-आकाराची LED टेललाईड्स सामील आहेत.
डिझायरचे इंटिरिअरमध्ये बेज आणि ब्लॅक थीम आणि डॅशबोर्डवर फॉक्स वुड एक्सेंट आहे. या एनालॉग ड्रायव्हर डिस्प्ले, क्रुझ कंट्रोल, एपल कारप्ले आणि एंड्रॉईड ऑटोसाठी वायरलेस कम्पॅटिबिलीटी सह ९ – इंच टचस्क्रीन, रिअर वेंट्ससह एअर कंडीशनिंग आणि सिंगल- पॅन सनरुफ सारखे फिचर्स मिळत आहेत. मारुती सुझुकीची रिवाईज्ड कॉम्पॅक्ट सेडानमध्ये रिअर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), ६ एअर बॅग ( स्टँडर्ड) आणि ३६० -डिग्री कॅमेरा ( सेगमेंटमध्ये पहिल्यांदा ) सह अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.
नवीन डिझायरमध्ये स्विफ्टमधून घेतलेले १.२ लिटरचे तीन सिलिंडर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलेले आहे.ते युनिट ८० bhp मॅक्सिमम पॉवर आणि ११२ Nm चे पिक टॉर्क जनरेट करते. यात ५ – स्पीड मॅन्युअल वा AMT ट्रान्समिशनसह जोडले गेले आहे. या कारला LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus व्हेरिएंट लाँच केले जाणार आहे. न्यु डिझायर कंपनीची पहिली अशी कार आहे ज्याला ग्लोबल NCAP मध्ये सेफ्टीसाठी 5-स्टार रेटींग मिळाली आहे. हीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत ६,२५,६०० रुपये आहे.