मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
Saam TV October 23, 2025 04:45 AM
  • रवींद्र धंगेकरांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • एकनाथ शिंदे धंगेकरांविरोधात कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • तर शिंदे आपल्यावर कारवाई करणार नसल्याचा दावा रवींद्र धंगेकर म्हणालेत.

शिंदे गट शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं सुरू केलंय. आत् करत पुण्यातील राजकारणात तापवलंय. पुणे शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळकरांना अडचणीत आणलंय. मुरलीधर मोहोळ यांनी कोट्यवधीच्या जमीन घोटाळा केल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

स्थानिक भाजपनेते नाराज झालेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केलीय. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा सुरू झालीय. हाकलपट्टी होणार असल्याची बातमी येताच रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाहीये. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर म्हणून मी बोललेच पाहिजे. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. गुन्हेगारी असेल, सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांनाच जाब विचारला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना थोडा जाब विचारता येईल.

मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली. त्यात बिल्डरांसोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला. पुणेकरांना याचा विचार करावा लागेल. देव धर्म जिथे गहाण ठेवले जात आहेत, तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाही याची मला जाणीव आहे असंही धंगेकर यांनी सांगितलं.

मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतलं नाहीये. याउलट भाजप नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतायत. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिलंय. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करणार. प्रत्येक वेळी युती धर्म आड येत असेल तर मी शिंदेंशी बोलेन. शिवसेना असेल, भाजपा असेल तर चुका दाखवणे त्यात काही गैर नाहीये.

माझ्यावर कारवाईबाबत माहिती नाही. मी माझी बाजू मांडेन, असंही धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीतत असं म्हटलंय. पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नसल्याचं धंगेकर म्हणालेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.