टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा हायवेवर कारच्या टपावर बसून स्टंट
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप
पोलिसांकडून गाडीच्या नंबरवरून आरोपींना शोधण्यास सुरुवात
आरटीओ आणि वाहतूक पोलिसही या प्रकरणात कारवाईसाठी सज्ज
मुंबई : राज्यातील विविध भागात पोलिसांकडून हुल्लडबाजांवर कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि पुण्याच्या गुंडांची पोलिसांकडून भरस्त्यात धिंड काढण्यात आली. पोलिसांकडून या पद्धतीच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे. या हुल्लडबाजांमध्ये टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची भर पडली आहे. टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर नागरिकांंकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून गुंडांची धिंड काढली जात आहे. कायद्याचा जिल्हा, नाशिका जिल्हा, असे वाक्य या गुंडांकडून पोलीस वदवून घेत आहेत. नाशिकनंतर पुणे पोलिसांनीही हुल्लबाजांवर मोठी कारवाई सुरु आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी गुन्हेगारी स्टाइल रिल्स तयार करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. पोलिसांनी त्यांना सर्वांसमोर माफीनामा सादर करायला लावला. आता मुंबईतही गुन्हेगारी स्टाइल्स रिल्स तयार करणाऱ्या टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवलाटायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर हुल्लडबाजी केली. या कार्यकर्त्यांनी वेगवान कारच्या टपावर बसून तरुणांकडून रस्त्यावर हुल्लडबाजी करत असल्याचं दिसत आहे. या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'मी किंग नाही, किंग मेकर आहे, असं या कार्यकर्त्यांच्या रिल्समधील गाणं आहे. टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्याही जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारानंतर नागरिकांकडून हुल्लडबाज तरुणांवर कारवाईची मागणी होत आहे.
दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viralहायवेवर कारवर बसून हुल्लडबाजांच्या कृत्याची वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून व्हिडिओची दखल घेण्यात आली आहे. पोलिसांकडून कारच्या नंबर प्लेटवरून शोध घेण्याचे काम सुरू आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.