मुंबई : तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. एका दिवसात तब्बल १७ हजार ३८३ प्रवाशांना पकडून रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून एक कोटी ३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी असल्याचे प्रशासनाने सांगितले.
विविधरेल्वेस्थानकांवर शनिवारी (ता. १८) ही संयुक्त तपासणी मोहीम पार पडली. तिकीट नसणे, योग्य दर्जाचे तिकीट न घेणे, परवानगीपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करणे या विविध कारणांवरून कारवाई करण्यात आली. अनेक प्रवासी तिकीट खिडक्यांवरील गर्दी, सुट्टे पैसे नसणे किंवा घाई या कारणांमुळे तिकीट काढत नाहीत, मात्र रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणतेही कारण ग्राह्य धरले जाणार नाही. नियमबाह्य प्रवास केल्यास दंडाची कारवाई निश्चित आहे.
Mumbai News: धोबीघाट पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचे आदेश रेल्वेची विक्रमी कारवाईही कारवाई पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी असल्याचे प्रशासनाने सांगितले. यापूर्वी १० नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या तपासणीत एक कोटी २८ लाख रुपयांचा दंड वसूल झाला होता. त्या तुलनेत यंदा झालेली कारवाई अधिक व्यापक असून, तो विक्रम मोडीत निघाला आहे.
रेल्वेप्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, तिकिटाशिवाय प्रवास करू नये. मोबाईल तिकीट ॲप, स्वयंचलित मशीन आणि ऑनलाइन पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांनी या सुविधांचा वापर करून नियमांचे पालन करावे.
Mumbai News: राज्य सरकारला नोटीस! शिक्षकांविरोधात तक्रारीप्रकरणी न्यायालयाचे आदेश