Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते. त्यातच आता मालिकेतील नव्या ट्विस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
मालिकेत ईश्वरीसमोर राजेशचे खरे हेतू उघड झाले आहेत. तिची आणि अर्णवची मैत्री पुन्हा एकदा झाली आहे. त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षक खुश तर झाले पण त्यांनी वेगळीच मागणी केली आहे.
प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, ईश्वरी दिवाळीच्या पूजेची तयारी करत असते. ती उठत असताना कुणीतरी तिचा हात धरत. तिला आधी अर्णव वाटतो म्हणून ती लाजते पण जेव्हा ती वळून बघते तेव्हा तो राजेश असतो. ती तिची छेड काढतो. तो तुझ्याकडून आज मला पाडव्याला उटणं लावून घ्यायचं आहे असं म्हणतो. तो तिचा हात पकडून उटण्यात बुडवतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर लावणार तेव्हाच अर्णव तिथे येऊन त्याला रोखतो. तो उटणं त्याच्या चेहऱ्यावर फेकतो आणि राकेशला बजावतो आणि "आज याच्याकडून तुझे पाय पाडवा संपायच्या आत धुवून घेईन. हेच तुझं आपल्या पहिल्या दिवाळी पाडव्याचं गिफ्ट असेल. " असं म्हणतो.
View this post on InstagramA post shared by star_marathi_serial_official (@star_marathi_serial_official)
प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले. "काही पण बोला पण @aashu.g नि बेस्ट हिरो म्हणून रंग माझा वेगळा आणि बेस्ट व्हिलेन म्हणून तू ही re माझा मितवा मध्ये अप्रतिम काम केलंय...","आता अर्णव ईश्वराची लव्ह स्टोरी दाखवा.","राजेशचं सत्य समोर आणा.","आता मजा येणार" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
अर्णव आता काय करणार ? ईश्वरी अर्णवचा पाडवा कसा असेल ? हे पाहण्यासाठी पाहत राहा तू हि रे माझा मितवा दररोज रात्री 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
'माझ्यात जी चमक आहे ती तमन्नामध्ये नाही' राखी सावंत तमन्नाबद्दल बोलताना म्हणाली...'आमच्या आयटम सॉन्गमध्ये घुसली आणि...'