कळमनुरी : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाल्यामुळे झेंडूचे भाव पडले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फुलांना योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने आपला माल बाजारात आणलेल्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. दर कोसळल्यामुळे लागवड खर्चही निघणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर चांगले उत्पन्न निघेल, या आशेवर शेतकऱ्यांकडून झेंडू फुलांच्या रोपांची लागवड केली जाते. परिसरातील सालेगाव सांडस, चाफनाथ, म्हैसगव्हाण या भागांतील शेतकरी झेंडूची शेती करतात.
मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे झेंडू शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या झेंडू फुलशेतीची काळजी घेत शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावरही फुले बाजारात आणली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता.
मात्र, त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेल्या झेंडूला अपेक्षित भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी एकाचवेळी झेंडू विक्रीसाठी बाजारपेठेत आणल्यामुळे सुरवातीपासूनच फुलांचे भाव कोसळले. शंभर रुपयांना पाच किलो या दराने विक्री करण्यात आली. दुपारनंतर हा दर आणखी खाली आला.
Zendu Flower : गेवराईत सकाळी झेंडूला किलोला शंभरचा भाव तर दूपारी आला निम्म्यावरदसऱ्याच्या वेळी जो दर झेंडूच्या फुलांना मिळाला, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही.
- मारुती चितळकर, शेतकरी, कळमनुरी