युनिट-१ भाजी मार्केटमधील २० दुकानांना भीषण आग लागल्याने अग्निशमन दलाच्या ११ गाड्या तैनात करण्यात आल्या.
कोलकाता ते श्रीनगर इंडिगो 6E6961 विमानाचे इंधनाच्या समस्येमुळे वाराणसीमध्ये लँडिंगकोलकाता ते श्रीनगर इंडिगो 6E6961 विमानाने इंधनाच्या समस्येमुळे वाराणसीमध्ये प्राधान्याने लँडिंग केले. विमानात 166 प्रवासी होते: विमानतळ प्राधिकरण
Mumbai News: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजीवेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांकडून रस्त्यावर हुल्लडबाजी
व्हिडिओ सोशल माध्यमातून वायरल
स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या ही जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रकार
नागरिकांकडून या हुल्लडबाज तरुणांवर कारवाईची मागणी
वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून व्हिडिओची दखल
गाडीचा नंबर प्लेट वरून शोध घेण्याचे काम सुरू
RJD's Shweta Suman: राजदच्या श्वेता सुमन यांना अश्रू अनावरमोहनिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी रद्द झाल्याचा दावा करणाऱ्या राजदच्या श्वेता सुमन यांना अश्रू अनावर झाले.
केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी ८.३० वाजता हिवाळ्यासाठी बंद राहतील.
Mumbai News: अक्सा समुद्रात बुडाल्याने एक युवक बेपत्ताअक्सा बीच परिसरात समुद्रात चार जण पोहण्यासाठी गेले असता, त्यापैकी एक युवक बुडाल्याची घटना घडली आहे. उर्वरित तीन जण सुरक्षित किनाऱ्यावर परतले असले तरी एक जण बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून (MFB) शोधमोहीम सुरू आहे.
Live : "मुंबई महानगरपालिका निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात"- भाई जगतापकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्या मुंबई महानगरपालिका निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात या विधानावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणतात, "त्यांनी आपले मत व्यक्त केले... आम्ही जो काही निर्णय घेऊ तो आमचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, म्हणजेच राहुल गांधी, मल्लियार्जुन खर्गे आणि सोनिया* गांधी... पक्ष जो काही निर्णय घेईल तो आपल्या सर्वांना लागू होईल..."
Mumbai Live : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीपश्चिम द्रुतगती मार्गावर संभाजीनगर विलेपार्ले येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी
अंधेरी कडून वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला अपघात
मागील पाऊण तासापासून मार्गावर वाहतूक कोंडी
वाहतूक पोलिसांकडून अपघातग्रस्त गाडी बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू
Dahanu Live : ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना; चळणी येथे १० वर्षीय अलका भावरचा नदीत बुडून मृत्यूडहाणू तालुक्यातील दाभाडी हटिचामाळ येथील रहिवासी अलका कासम भावर (वय १०, इयत्ता चौथी, अरविंद आश्रम शाळा, दादडे) या बालिकेचा चळणी येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दिवाळीच्या सुट्टीसाठी आईसोबत चळणी येथे नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून आलेली अलका आंघोळीसाठी नदीकाठी गेली असता पाय घसरून ती पाण्यात पडली.
Nandurbar Live : नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाळा सुरुवातनंदुरबार शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाराही वाहत असून या वातावरणामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाच्या पिकांना यामुळे मोठा फटका बसणार आहे.
Dahisar Live: दहिसर पूर्व अंबावाडीमध्ये फटाका फोडण्यावरून तरुणाला मारहाणदहिसर पूर्व अंबावाडी भागात फटाके फोडण्याच्या वादावरून संजय जायसवाल नावाच्या व्यक्तीला 10 ते 12 जणांनी एकत्र येऊन मारहाण केली. या हल्ल्यात जायसवाल यांच्या नाकाला फ्रॅक्चर झाले असून चार टाके घालावे लागले आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, घटनेची माहिती दिल्यानंतरही दहिसर पोलिसांनी एनसी (गैर-गुन्हा नोंद) दाखल न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Nandurbar Live: नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवातहवामान खात्याचा अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात...
नंदुरबार शहरासह परिसरात पाऊस...
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात....
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील धडगाव आणि काकडदा परिसरात पाऊस.....
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ...
Mahesh Kothare Live: महेश कोठारेंवर ठाकरे गटाची टीकामी मोदीभक्त असं म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्यात म्हणून अशी मुक्ताफळं उधळत असल्याची टीका त्यांनी केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये महेश कोठारे यांची सून आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेचा अपघात झाला होता.
Gold Live: मुंबईत पाडव्यानिमित्त सोनं खरेदीसाठी गर्दीमुंबईत पाडव्यानिमित्त सोनं खरेदीसाठी गर्दी पहायला मिळतेय. सोन्याचे दर १ लाख ३१ हजारांवर पोहोचले असून चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदी १ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. काल चांदीचा दर १ लाख ७१ हजार रुपये होता. चांदीच्या खरेदीत आज वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सोनं खरेदीसाठी दागिन्यांना पहिली पसंती दिली जात आहे. सोन्याचे दर हे पुढच्या मे महिन्यापर्यंत २ लाख रुपये प्रती तोळे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Shirdi Live: शिर्डीला पावसानं झोडपलं, पावसामुळे भाविकांची तारांबळशिर्डीत अचानक आलेल्या पावसाने भाविकांची तारांबळ
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज शिर्डी परिसरात पावसाची हजेरी
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी घेतला, संस्थेनं उभारलेल्या मंडपाचा आसरा
तर काही चिमुकल्यांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद
शिर्डीमध्ये अर्धातास जोरदार पावसाची हजेरी
Nanded Live : नांदेडच्या कलदगाव येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलननांदेडच्या कलदगाव येथे संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी बांधवांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी, 'आवश्यक वस्तू कायदा 1955 रद्द करणे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे. यासह, रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खते, बियाणे आणि औषधे माफक दरात उपलब्ध करून देणे, तसेच कृषी प्रयोग शाळा प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ravi Rana Live : आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर पुन्हा गंभीर आरोपऐन दिवाळीत राहणार विरुद्ध कडू हा वाद भेटला असून राणाविरुद्ध कडू हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून बच्चू कडू यांना डिवचलं आहे. बच्चू कडू हा चिल्लर आहे याला मी नखांनापासून केसापर्यंत ओळखतो त्याचा एकच नारा आहे बाप बढा ना भैया सबसे बडा रुपय्या असे म्हणत रानांनी बच्चू कडू यांना सुनावल्याच पाहायला मिळत आहे.
Mohadi Live: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळपबलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप...मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात आजही जपली जातेय १५५ वर्षांची प्रथा.
Live: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधनज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन
१०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बुधवारी सकाळी चिटणीस या चे पुण्यात निधन झाले
इस्रोच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी १९७० च्या दशकापासून केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोहचले
Live: "देवा" आता तूच आमच्या अण्णाला माफ कर, वसंत मोरे यांचे अनोखे आंदोलनपुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलं. यावेळी वसंत मोरे यांनी एक फ्लेक्स घेऊन त्यावर "देवा आता तूच आमच्या अण्णाला माफ कर" असे लिहित आंदोलन केले. यामध्ये देवा हा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वापरला असल्याचं या फ्लेक्समधून स्पष्ट होत आहे. सध्या पुण्यातील जैन बोर्डींग असतील संदर्भातील विषयाबाबत महाविकास आघाडी कडून मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जोरदार टीका होत आहे.
Live: लातूर जहीराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी मांडली चटणी-भाकरीची पंगतऐन दिवाळीत लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा येथे शेतकऱ्यांनी चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला आहे, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पॅकेज जाहीर केलं मात्र खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नाही, शेतकऱ्याच्या घरात अंधार आहे, तर सरकार फसव आश्वासन देत दिवाळी साजरी करत आहे . दरम्यान आज बलिप्रतिपदा, म्हणजे बळीराजाचा दिवस आणि याच दिवशी शेतकऱ्याला चटणी भाकर खाण्याची वेळ सरकारने आणली आहे म्हणत, लातूर जहीराबाद महामार्गावर मसलगा येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चटणी भाकर खात सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Nashik Live: नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमकनाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक
- नाशिक विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून उपोषणाला सुरुवात
- अनेक स्थानिकांची घरं आणि दुकानं रुंदीकरणामध्ये जात असल्याने स्थानिक आक्रमक
- शासन भरपाई देणार की नाही, याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम
- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी गावाजवळ आंदोलनाला सुरुवात
Satara LIVE : वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात यश, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वासमहाबळेश्वरच्या वेण्णालेक येथे अडकलेली बोट सुखरूप बाहेर काढण्यात पालिका प्रशासनाला यश
स्वतः पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्यासह टीमकडून बचावकार्य
पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास
Nashik Live : पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड- नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस
- पंचवटीतील अवधूत वाडी भागात वाहनांची तोडफोड
- दारू पिऊन आलेल्या टवळखोरांनी दुचाकींची तोडफोड करत घातला धिंगाणा
- घटनेचा थरार स्थानिकांनी केला मोबाईलमध्ये कैद
- नाशिकमध्ये पोलिसांकडून टवाळखोरांची धरपकड सुरू असतानाही टवाळखोरांचा धुडगूस कायम
akola Live : अकोल्यात भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यूऐन सणासुदीच्या काळात अकोल्यात मोठी दुर्घटना घडली आहे. अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा जवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एक जण किरकोळ जखमी आहे.
LiveUpdate: वाशिमच्या शिरपूर बसस्थानकात पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे नागरिक हैराणशिरपूर बसस्थानक परिसरात पावसाचे साचले पाणी जैन समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमध्ये काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शिरपूर बसस्थानक परिसरात आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. तर काही ठिकाणी चिखल आणि घाण साचल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून,नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नाले स्वच्छ करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे.
Diwali 2025 LiveUpdate: पांडवदेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात साजरायवतमाळ मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक मिरवणूक, गाईंची सजावट आणि भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली.
Kolhapur Live : कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौदापाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गूळ बाजारात आला असून कोल्हापूरमध्य पाडव्याच्या मुहूर्तावर पहिला सौदा करण्यात आला.
Bhiwandi Live : भिवंडीत सिलिंडरच्या स्फोटामुळे गोदामाला आगभिंवडीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने गोदामाच्या तीन भिंती कोसळल्या आणि आगही लागली, या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.
Jharkhand Police : 'आरजेडी'च्या उमेदवाराला झारखंड पोलिसांनी केली अटकसासाराम : बिहारमधील सासाराम येथील आरजेडीचे उमेदवार सतेंद्र साह यांनी सोमवारी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर झारखंड पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती मंगळवारी बिहार पोलिसांनी दिली. २००४ मध्ये झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एका बँकेवर दरोडा टाकल्याच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Karnataka Weather Update : पुढील दहा दिवस पाऊस सुरूच राहणार, आज मुसळधारेची शक्यताबंगळूर : पुढील १० दिवस राज्यभर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने आज दिला. किनारी जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, दक्षिणेकडील अंतर्गत भागातही पाऊस पडेल. चिक्कमंगळूर, शिमोगा, कोडगू, चामराजनगर आणि हसन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar : परतूरच्या फटाके बाजारात तलवारीने हल्ला; दोघे गंभीरपरतूर : फटाके खरेदी करताना झालेल्या वादातून तलवार, चाकू, रॉडने हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री परतूर शहरातील मोंढा भागात घडली. याप्रकरणी परतूर ठाण्यात दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
Beed News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तरुणांच्या दोन गटांत राडा, दगड मारून फोडले डोकेबीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ १९ ऑक्टोबरला तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. अभिषेक प्रकाश गायकवाड यास गणेश भारत गिरी याने दगड मारून डोके फोडले. सूर्या तावरे आणि आर्यन पवार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
Jalna News : जालन्यात बंजारा समाजातर्फे उपोषणस्थळी दिवाळी साजरीजालना : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा ‘एसटी’ प्रवर्गाच्या आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी शहरातील अंबड चौफुली परिसरात गेल्या पाच दिवसांपासून विजय चव्हाण यांचे उपोषण सुरू आहे. बंजारा समाजबांधवांनी मंगळवारी (ता. २१) उपोषणस्थळी दिवाळी साजरी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मेरा’ (वडिलधाऱ्यांकडून अत्यावश्यक वस्तूंची मागणी करण्याची पद्धत) मागितला. उपोषणस्थळी समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत रिंग नृत्य केले. त्यानंतर तेथे चूल मांडून स्वयंपाक केला. समाजातील तरुणींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने ‘मेरा’ मागताना एसटी आरक्षणाची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीनिमित्त दिवे लालून अनोखे आंदोलन केले.
Pune Diwali : पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह; दिवाळी पाडव्यानिमित्त सारसबागेत मोठी गर्दीपुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पहायला मिळतेय. पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली. सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून गर्दी झाली होती.
Rajiv Deshmukh Passed Away : माजी आमदार राजीव देशमुखांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कारराष्ट्रवादी शरद पवार गटाचे चाळीसगाव येथील माजी आमदार राजीव देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी दहा वाजता चाळीसगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार आणि विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Mumbai News : बंदरांतून १२५ टन चिनी फटाके जप्तमुंबई : दिवाळी आणि अन्य सणांच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील महानगरांत चिनी फटाक्यांची व्रिक्री केली जाते. यंदा महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) या केंद्रीय यंत्रणेने ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहीम राबवून गेल्या काही आठवड्यांत न्हावा-शेवासह देशभरातील बंदरांवर उतरणारे १२५ टन (४० कोटींहून अधिक किमतीचे) चिनी फटाके जप्त केले आहेत.
Rajiv Deshmukh Passed Away : चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे निधनचाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (वय ५४) यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहेदेशमुख यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळ्याला नेल्यावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
CM Devendra Fadnavis : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणाLatest Marathi Live Updates 22 October 2025 : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार (ता. २१) पर्यंत केवळ ५ हजार ८६६ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. तसेच चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (वय ५४) यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सोन्याचा भाव एक लाख ३० हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) होता. काल दुपारी त्यात घसरण होऊन तो दीड हजारांनी घटून एक लाख २९ हजार रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम) पोचला. आज पाडवा आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..