Kolhapur Panhala Accident : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मोटारसायकल व टेंपोच्या अपघातात सुळे (ता. पन्हाळा) येथील प्रणव सर्जेराव पाटील (वय १८) या युवकाचा मृत्यू झाला. प्रणव व त्याचा मित्र (नाव समजले नाही) कळे येथे काही कामानिमित्त मोटारसायकलवरून येत होते.
दरम्यान, विजय गजानन कोळेकर (रा. कळे, ता. पन्हाळा) हे आपला टेंपो घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीतून कळे गावात निघाले होते. याचवेळी मोटारसायकल घसरून खाली पडली.
Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...यामध्ये मोटारसायकलवर मागे बसलेला प्रणव थेट टेंपोच्या डाव्या बाजूकडील मागच्या चाकाखाली सापडला. ही घटना सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. प्रणव हा एकुलता एक मुलगा होता. तो विज्ञान शाखेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या मागे आई-वडील, बहीण, आजी व आजोबा असा परिवार आहे.