सासरे बुवा, तुमच्या मुलीला समजावा, ही अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांसोबत बोलते… एक जावई पत्नी विरोधात अशी तक्रार घेऊन आपल्या सासऱ्याकडे गेला. त्यावर सासऱ्याने मुलीचीच बाजू घेतली. त्यामुळे चिडलेल्या जावयाने टोकाचं, खतरनाक पाऊल उचललं. यामुळे सगळ्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जावयाने सुपारी देऊन आपल्या सासऱ्याची हत्या घडवून आणली. इतक्याने त्याचं समाधान झालं नाही. त्याला पत्नीची सुद्धा हत्या करायची होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.
हे प्रकरण मुरारीलाल चेस्ट हॉस्पिटलच आहे. अनीता देवी नावाची महिला रुग्णालयात दाखल होती. पती राजकुमार तिची काळजी घेत होता. काही दिवसांपूर्वी राजकुमारची हत्या झाली. नंतर समजलं की, जावई मोहित तोमरने राजकुमारची हत्या घडवून आणली. त्यासाठी ऋषभ नावाच्या व्यक्तीला 6 लाखाची सुपारीदिली होती. हत्येचं खरं कारण आता समोर आलं आहे.
मोहितच्या डोक्यात काय खतरनाक चाललेलं?
मोहितने पोलीस चौकशीत सांगितलं की, “माझ्या पत्नीचे लग्नानंतर तीन मुलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन आमच्या दोघांमध्ये वाद होता. मी माझ्या लग्नावर खुश नव्हतो. मी माझ्या सासऱ्यांकडे पत्नीची तक्रार केली, तर त्यांनी उलट पत्नीची बाजू घेतली. सोबतच मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे मला राग आला. मग, मी सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली. पत्नी नम्रताला सुद्धा कारखाली चिरडून मला मारायचं होतं. मेहुण्याची सुद्धा हत्या करायची होती. पण त्याआधीच मी पकडला गेलो”
किती वर्षांपूर्वी झालेलं लग्न?
सध्या आरोपी अटकेत आहे असं पोलिसांनी सांगितलं. मोहितने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरोधात पुढील कारवाई सुरु आहे. मोहितने सांगितलं की, 11 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं. पत्नी तिच्या प्रियकरांसोबत बोलायची. त्यामुळे घरात क्लेश व्हायचा.