जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा दावा केला.
'स्थानिक नेत्यांऐवजी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू'- राऊत
काँग्रेस नेते भाई जगतापांच्या वक्तव्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. या निवडणुका एकत्र लढवाव्यात की स्वतंत्र, याबाबत पक्षांच्या नेत्यांकडून मत विचारले जात आहे.
अशातच मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत बिघाडी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. भाई जगताप यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'युतीसंदर्भात स्थानिक नेत्यांशी नसून, दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू'; असं संजय राऊत म्हणाले.
भाई जगताप यांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, 'कोण काय बोलतं, मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. काँग्रेस हा आमचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने जर तो निर्णय घेतला असेल तर, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. आम्हाला काही अडचण आली तर, आम्ही राहूल गांधी यांच्याशी चर्चा करू. राहूल गांधींव्यतिरिक्त पक्षातील इतर चार प्रमुख नेते आहेत, त्यांच्याशी बोलू', असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघडआम्हाला काँग्रेसचा प्रधानमंत्री करायचा होता, असं संजय राऊत म्हणाले. 'ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. ही बाब काँग्रेसने समजून घ्यायला हवी. आम्हाला काँग्रेसचाच प्रधानमंत्री करायचा होता. पण नाही होऊ शकला ना, आम्ही INDIA आघाडी तयार केली. आम्हाला राहूल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं. आम्ही असं नाही म्हणालो की, शिवसेना किंवा अन्य पक्षाचा करायचा आहे. आमचे विचार आणि मत पारदर्शक आहे', असं संजय राऊत म्हणाले.
धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?'काँग्रेस दिल्लीत सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच. आमचं मन फार मोठं आहे. आम्हाला राहूल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. मुंबईचा महापौर पद घेऊन काय बसलेत ते महाशय', असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाई जगताप यांना लगावला आहे. 'काँग्रेसची साथ सोडणार नाही असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नाही. मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहे', असंही राऊत म्हणाले.