Elon Musk on AI : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला,स्पेसएक्स आणि एक्स सारख्या दिग्गज कंपन्यांचा मालक याच्या एका वक्तव्याची जगभरात तुफान चर्चा सुरू आहे. मस्क हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) चाहता आहे. त्याच्या मते काही दिवसातच दैनंदिन मानवी जीवनात एआयचा शिरकाव होईल. त्यामुळे परिस्थिती बदलेले. सर्वच क्षेत्रात त्याचे परिणाम दिसतील. एआय मानवासाठी जसे वरदान ठरेल. तसेच त्याचा फटका पण बसेल. मनुष्याला शेतीत पीक घेण्यापलिकडं फारसं काम उरणार नाही, असा त्याचा दावा आहे. त्याच्या भाकिताकडे अनेक जण गांभीर्याने पाहत आहेत.
1 लाख 60 हजार नोकऱ्या एआय खाणार
एलॉन मस्क याच्यानुसार, एआय सर्व नोकऱ्या खाऊन टाकेल. पण मानवाने चिंता करू नये. त्याच्यासाठी हे वरदान असेल. तो नोकऱ्यांच्या किचकट कामातून मुक्त होईल. एक्सवरील एका पोस्टला उत्तर देताना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon कर्मचाऱ्यांच्या ऐवजी एआय आणि रोबोट्सचा वापर करणार असल्याची माहिती त्याने दिली. 2027 पर्यंत एआय 1 लाख 60 हजार जणांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल असा त्याने दावा केला आहे. रोबोट्स आणि एआय त्यांची जागा घेतील असे मस्क याचे म्हणणे आहे.
मानवाने खुशाल शेती करावी
मस्क याच्या या कमेंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. अनेक क्षेत्रात एआय आणि रोबोट्सची घुसखोरी होणार असल्याचा त्याता दावा आहे. पण त्याचे मते मनुष्याने आता फार काळजी करण्याचे कारण नाही. कारण मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील धावपळ बंद होईल. त्याला कार्यालयीन वेळेची अडचण राहणार नाही. नोकरीच नसेल. तेव्हा या निवांत वेळेत त्याने खुशाल शेती पिकवावी. धान्य काढावे. पिकांची काळजी घ्यावी. निवांत वेळ घालवावा.
अनेकांना दावा फेटाळला
एलॉन मस्क जरी असा दावा करत असला तरी काही ठराविक क्षेत्रात त्याच्या दाव्याला बळकटी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वच क्षेत्रात एआय आणि रोबोट्सचा वापर गोंधळाची स्थिती निर्माण करणारा ठरेल. ज्या कंपन्या सध्या यासाठी प्रोत्साहन देत आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. त्यांना ज्या दिवशी मोठा तांत्रिक बिघाड होईल. मोठे शटडाऊन होईल. त्यादिवशी कर्मचाऱ्यांची जरूर आठवण येईल असा तज्ज्ञांचा दावा आहे. एआयला स्वतःला काही मेंदू नाही. तो जगभरातून अर्जित केलेल्या ज्ञानावरच मिजास दाखवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याला सातत्याने जर गोंधळात टाकणारी माहिती दिली तर तो मोठे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे दुधारी हत्यार अनेक उद्योगांच्या मुळावर घाव घातल्याशिवाय राहणार नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे.